(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : मी कधीच कोणाला घाबरत नाही; दाऊद आला, शकील आला पण मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : दोन चार टकल्यांना सोबत घेवून पक्ष पक्ष मोठा होत नाही. आपली लोकं मोठी होत होती हे तुम्हाला नको होते. एकमेकांना झुंजवत होते, अशी टीका त्यांनी केली.
कोल्हापूर : वारसा सांगणाऱ्यांनी पहिल्यांदा आरसा पहावा, बाळासाहेबांचा वारसा सांगण्यास तोंडात नारा, मनगटात मेहनत असावी लागते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते आज कोल्हापुरात महाधिवेशनात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चांगलाच समाचार घेतला.
नारायण राणे राज ठाकरे यांचा तुम्हाला काय त्रास होता?
ते म्हणाले की, शिवसेनेसाठी अनेक शिवसैनिकांनी घरावर तुळसीपत्र ठेवले. आणि हे आले पीठावर आयत्या रेगोट्या मारायल, पण त्या सुद्धा नीट मारता आल्या नाहीत. नारायण राणे राज ठाकरे यांचा तुम्हाला काय त्रास होता? एखादा चांगला भाषण करायला लागला की त्यांचे भाषण कट करु लागले. दोन चार टकल्यांना सोबत घेवून पक्ष पक्ष मोठा होत नाही. आपली लोकं मोठी होत होती हे तुम्हाला नको होते. एकमेकांना झुंजवत होते, अशी टीका त्यांनी केली.
तर मी मुख्यमंत्री झालो नसतो
ते म्हणाले की, असा नेता मी कधीच पाहिला नाही. मी त्यांना बोललो होतो युती करा. झालेली चूक सुधारु. युती झाली असती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. मी पाच वेळा त्यांना सांगितले आपण युती केली पाहिजे. शेवटी मला ते म्हणाले पुढील जी काय अडीच तीन वर्षे आहेत ते ती आपल्याला देतील. पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. शिवसेनेचे काहीही होवू दे.
मी कधीच कोणाला घाबरत नाही
त्यांनी सांगितले की, जेव्हा मी गडचिरोलीत काम करत होतो, तेव्हा पोलिस बोलले आपल्याला मायनिंगचे काम करता येणार नाही. मी बोललो नक्षलवाद मोठे की सरकार मोठे? कारखाना चालू केला. 10 हजार लोकांना रोजगार मिळाला. आणखी प्रोजेक्ट घेतले असून हजारो रोजगार मिळतील. मी कधीच कोणाला घाबरत नाही दाऊद आला शकील आला पण मी कोणाच्या धमकीचा घाबरत नाही.
शिवसेनेचे हिंदूत्व व्यापक आहे. आता हिंदूहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते, पण यांनी तर काँग्रेसला मांडीवर घेवून बसले. शिवसेना वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागले, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितलं नाही.
आता संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटूंब आहे. माझं कुटूंब माझं घर असं माझं नाही. माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक आहे. हीच लोकं माझे कवच कुंडले आहेत, मारने वाले से बडा बचानावाला होता है, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या