Kolhapur Crime : चिपळूण तालुक्यातील डाक सहाय्यकाकडून चंदगडमधील महिला पोस्ट मास्तरने लग्नास नकार दिल्याने चारित्र्यहननचा प्रयत्न!
Kolhapur Crime : चंदगड तालुक्यातील (Chandgad Taluka) महिला पोस्टमनने लग्नास नकार दिल्यानंतर चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न चिपळूण तालुक्यातील सहाय्यक पोस्ट मास्तरने केला आहे.

Kolhapur Crime : चंदगड तालुक्यातील (Chandgad Taluka) महिला पोस्टमनने लग्नास नकार दिल्यानंतर चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न चिपळूण तालुक्यातील सहाय्यक पोस्ट मास्तरने केला आहे. पीडित महिला पोस्टमनला याबाबत माहिती समजल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर डाक सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महाभागाने महिलेच्या कार्यालयात जाऊन डाक सहाय्यकाने चारित्र्यहननचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संशयित डाक सहाय्यक शिरगाव (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील आहे. तो डाक सहाय्यक 20 ऑक्टोबर रोजी चंदगड पोस्ट कार्यालयात कामाचे कारण काढून आला होता. या ठिकाणी आल्यानंतर पीडित महिला पोस्टमास्तरकडे लग्न झालं आहे की नाही? याची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी कुटुबीयांकडून याबाबत स्थळ पाहणीचे काम सुरु असल्याची माहिती त्या महिला पोस्ट मास्तरने त्याला दिली.
यावेळी डाक सहाय्यकाने तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असल्याचे म्हणाला. डाक सहाय्यकाला महिला पोस्टमास्तरने समजावून सांगताना त्याला नकार दिला. त्यानंतरही संशयित डाक सहाय्यकाने मोबाईलवरुन फोन करुन जवळीकीचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने, तुझे लग्न कसे ठरते ते बघतो, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडिताने नंबर ब्लॉक केला. इतक्यावरही त्याने न थांबता संशयिताने संबंधितांचे नंबर मिळवून त्यांच्याकडे संबंधित महिलेचे चारित्र्यहनन होईल, असे संभाषण केले. याची माहिती पोस्टमनने त्या महिलेला दिल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
