(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : आई पाच दिवस सर्वत्र शोधत राहिली अन् पोटच्या लेकराची घराच्या माळ्यावर गळफास घेत आत्महत्या
कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहेत. जिल्ह्यातील (Kolhapur Crime )आजरा (Ajara taluka) तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी भयंकर अशी घटना घडली.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहेत. जिल्ह्यातील (Kolhapur Crime )आजरा (Ajara taluka) तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी भयंकर अशी घटना घडली. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध लागत नसल्याने आई कासावीस झाली होती. तिच्या परीने सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लेकराचा शोध काही लागत नव्हता. मात्र, पाच दिवसांनी भाड्याने राहत असलेल्या घरात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर तिने माळ्यावर जाऊन पाहिले असता मुलाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्यानंतर आईने एकच हंबरडा फोडला. आपल्याच लेकराने घरच्या माळ्यावर आत्महत्या केल्याची तिला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. (Kolhapur Crime )
मुमेवाडी आजरा येथील भिऊगंडेत स्वप्नील शिवाजी भिवंडी (वय 28) हा आईसोबत भाड्याच्या घरात राहत होता. वडील वारल्यानंतर आईनेच स्वप्निलचा सांभाळ केला होता. तो एका ठिकाणी नोकरी करत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्यानंतर कासावीस झालेल्या आईने त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिवसभर काम करून आई शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मुलाचा काहीच शोध लागत नव्हता. त्यांच्या राहत्या घराच्या माळ्यावरून दुर्गंधी यायला लागली म्हणून त्यांनी माळ्यावर जाऊन पाहिले आता स्वप्नील छताला गळफास घेतल्याचे आढळले. दरम्यान, याबाबत पोलिसांना नोंद झाली आहे.
पती आणि प्रेयसीने शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार
दुसरीकडे पन्हाळा तालुक्यातील वाळवेकरवाडीत विवाहितेने 16 डिसेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर विवाहितेच्या भावाने आपल्या बहिणीचा पती आणि प्रेयसीने छळ करून (physical torture) आत्महत्येस प्रवृत केल्याची फिर्याद दिली आहे. नीशा बाजीराव वाळवेकर (वय 30) असे आत्महत्या केलेल्य विवाहितेचं नाव असून तिने आपल्या माहेरीच आत्महत्या केली होती. मात्र, नीशाचा भाऊ सुजित बंडू लवटे (रा. वाळवेकरवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याने बहिण नीशाने पती बाजीरावला whatsapp मधून पाठवलेला फोटोतील मजकूर असलेली वही सापडल्यानंतर कळे पोलिसात फिर्याद दाखल केली.
सुजितने दिलेल्या फिर्यादीनंतर बाजीराव रंगराव वाळवेकर, काश्मीरी गमरे, पराग गमरे आणि मानसी गमरे यांच्याविरोधात कळे पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बाजीरावच्या असलेल्या प्रेमसंबंधामुळे नीशाचे त्याच्याशी खटके उडत होते. मात्र, बाजीरावच्या वागण्यात कोणताच बदल न झाल्याने नीशाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या