Kolhapur Worst Road : तर प्रशासक आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत येऊ देणार नाही! कोल्हापुरातील रस्त्यांसाठी काँग्रेसकडून आठ दिवसांचा अल्टीमेटम
Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी आज अनोख खोरे-पाटी आंदोलन केले. काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी आज अनोख खोरे-पाटी आंदोलन केले. काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी येतो. मात्र, ठेकेदार आणि महापालिका प्रशासन निधीचा योग्य वापर करत नसल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेत (Kolhapur Municipal Corporation) निदर्शने केली. या अधिकाऱ्यांची भूक आहे तरी किती? भ्रष्टाचार करत राहतात, अशी विचारणा काँग्रेस नेते शारगंधर देशमुख यांनी यावेळी केली.
तर प्रशासक आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत येऊ देणार नाही!
काँग्रेसचे नेते शारगंधर देशमुख यांनी कोल्हापुरातील रस्त्यांसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आठ दिवसांत रस्त्यांचा दर्जा सुधारल नाही, तर मनपा प्रशासक आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत येऊ देणार नाही, असा जाहीर इशारा दिला आहे.
मुर्दाडलेल्या अधिकाऱ्यांना चर्चेनं फरक पडत नाही
शारगंधर देशमुख यांनी मनपा प्रशासनाविरोधात हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाची प्रशासनाला सहकार्य करून लोकांना अधिकाधिक मदत देता येईल, अशी राहिली आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा तीच शिकवण आहे. आंदोलने न करता चर्चेतून मार्ग कसे निघतील, असा आमचा प्रयत्न राहिला आहे. मात्र, मुर्दाडलेल्या अधिकाऱ्यांना या चर्चेचा फरक पडत नाही. आपली संपत्ती कशी वाढेल, ठेकेदारांची संपत्ती कशी वाढेल याकडे निव्वळ लक्ष आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेचं अतोनात हाल होत आहे. येणाऱ्या पर्यटकांमध्येही कोल्हापूर शहराबद्दल वाईट मत तयार झालेलं आहे. यांना कोणतीही जाणीव राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही आज आंदोलन केल. यापुढेही अशाच पद्धतीने आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल.
Kolhapur Municipal Corporation : ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप
दरम्यान, कोल्हापूर शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
ठेकेदार भोसलेच्या कामातील दिरंगाईबद्दल विलंब आकार म्हणून 24 हजार दंडाची शिक्षा करण्यात आली. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रंमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत प्रभाग क्रमांक 33 महालक्ष्मी मंदीर या प्रभागातील जामदार वाडा मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करणेचे काम ठेकेदार शैलेश भोसलेला देण्यात आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या