Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा; पावसाने पूर्णत: दडी मारल्याने काटकसर सुरु
Kolhapur Water Crisis: कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र या दोन्ही नेत्यांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने उपसा करण्यावर परिणाम झाला आहे.
Kolhapur Water News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्ये आणि नद्यांमध्येही पाणी पातळी खालावल्याने कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उद्यापासून (15 जून) दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर मनपाचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे. गेल्या अनेक पाणी उपसा योग्यरित्या होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील अनेक भागात टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र या दोन्ही नेत्यांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने उपसा करण्यावर परिणाम झाला आहे. पंचगंगा नदीतून शिंगणापूर बंधारा येथून कोल्हापूर शहरासाठी पाणी घेण्यात येते. शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडीतून उपसा होण्याइतपत पाण्याची पातळी असली, तरी केवळ 10 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाने मारलेली दडी पाहता पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात आला आहे.
राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे.
या भागात टँकर्सने पाणीपुरवठा
दुसरीकडे कोल्हापूर शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरामध्ये तब्बल 51 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. मनपाकडून शहरातील शिवाजी पेठ साने गुरुजी वसाहत, सुर्वे नगर, तपोवन परिसर, नाळे कॉलनी, क्रशर चौक, राजेंद्रनगर, एसएससी बोर्ड परिसर, सुभाषनगर, टिंबर मार्केट, राजाराम चौक, विचारे माळ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, आदी ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. त्यामुळे नद्यांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांची पात्रे कोरडी पडली आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख पाणीसाठा
- राधानगरी धरणात 21.44 टक्के इतका पाणीसाठा आहे
- तुळशी धरणात 28.81 टक्के पाणीसाठा आहे
- वारणा धरणामध्ये 33.37 टक्के पाणीसाठा आहे
- दूधगंगा धरणात फक्त 5.90 टक्के पाणीसाठा आहे
इतर महत्वाच्या बातम्या