एक्स्प्लोर

Hasan Mushrif: शरद पवार कागलमध्ये डाव टाकण्याच्या तयारीत, समरजीत घाटगेंना उमेदवारीची चर्चा, हसन मुश्रीफ म्हणाले....

Maharashtra Politics: शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार? कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंना रिंगणात उतरवणार? सुप्रिया सुळे आणि समरजीत घाटगे यांच्यात सातत्याने बोलणी सुरु आहेत, सूत्रांची माहिती

कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर समरजीत घाटगे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांना तशी ऑफर देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामुळे कागल विधानसभेचे (Kagal Vidhansabha) विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची डोकेदुखी वाढू शकते. परंतु, मला विधानसभा निवडणुकीत कोण उभे राहील, याची चिंता नाही, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते सोमवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कागलमध्ये कोण जिंकणार, हे जनता ठरवेल. 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झालेला आहे. माझ्यासमोर कोण उभे राहणार, याची मी चिंता करत नाही. तिरंगी-चौरंगी कशीही लढत होऊ दे, मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार, असे हसन मुश्रीफ यांनी ठणकावून सांगितले.

राज्यात बहुरंगी निवडणूक होईल, हसन मुश्रीफांचं विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य

या वेळेला बहुरंगी लढती होतील. आता कोणी थांबायला तयार नाही. आठ-दहा पक्ष झाले आहेत. तिसरी आघाडी, चौथी आघाडी तयार होईल. या निवडणुकीत अनेक उमेदवार उभे असतील. बच्चू कडू यांनी काही दिवसांपासून वेगळी भूमिका घेतली आहे. ते तिसरी आघाडी करू शकतात.

अनिल देशमुखांवर मुश्रीफांची टीका

अनिल देशमुख यांना हे सर्व काढायचं होतं तर यापूर्वीच काढायला हवं होतं. इतके दिवस थांबण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचं काम अनिल देशमुख करत आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

संजय घाटगेंना मी कधीही पैसे दिले नाहीत: हसन मुश्रीफ

कागल विधानसभेची लढाई सोपी करण्यासाठी हसन मुश्रीफ संजय घाटगे यांना रिंगणात उतरायला सांगतात, त्यासाठी ते घाटगे यांना पैसे देतात, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना हसन मुश्रीफ यांनी म्हटले की, आईशपथ घेऊन सांगतो मी कधीही संजयबाबा घाटगे यांना विधानसभेला उभा राहण्यासाठी पैसे दिले नाहीत. निवडणूक तिरंगी करण्यासाठी मी संजयबाबा यांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण यात तथ्य नाही असा खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजयबाबा घाटगे यांनी आपण यावेळी मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर पैसे देण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, मी कधीही संजयबाबा घाटगे यांना पैसे दिले नाहीत असं मुश्रीफ म्हणाले. इतकंच नाही तर तुमच्या थर्मामीटरमध्ये मी बसत असेल तर यंदा मी पुन्हा लग्नाला उभा राहणार आहे, माझ्यावर अक्षता टाका असं म्हणत मुश्रीफ यांनी प्रचाराचा एकप्रकारे शुभारंभ केला. 

आणखी वाचा

शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार? कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंना रिंगणात उतरवणार?

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget