Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात बायकोच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून निर्घृण खून
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्लेत घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्लेत घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अनिता बाबासो जाधव असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिचा पती संशयित आरोपी बाबासो बळवंत जाधवला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार अनिताचा पती बाबासोला दारूचे व्यसन होता. त्यामुळे पत्नी पत्नीमध्ये सातत्याने वादातून खटके उडत होते. बाबासो कामधंदा काहीच करत नसल्याने वाद विकोपाला जात होते. यामधून सोमवारी दोघांमधील वाद अत्यंत विकोपाला गेला.
या वादात बाबासोने घरातील दगडी वरवंटा उचलत पत्नी अनिताच्या डोक्यात घातला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा तेजसने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित बाबासोला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले, पिंपळगावमध्ये महिलांनीच ग्रामसभा बोलवत घेतली बालविवाहविरोधी शपथ!
- Anand Mahindra : घरोघरी तिरंगावरून 'लोड' घेणाऱ्यांना आनंद महिंद्रांकडून कोल्हापूरच्या वृद्ध दाम्पत्याचा फोटो शेअर करत चोख उत्तर!
- Kolhapur News : वयाच्या 64 व्या वर्षी कोल्हापूरचा वाघ 75 किमी पळतोय! स्वातंत्र्यदिनी रंकाळ्याभोवती 9 तास 9 मिनिटांत 17 फेऱ्या मारून 75 किमी धावण्याचा विक्रम