(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवलेंसह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीतील प्रकारावरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रकारावरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या शहर संघटकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये राजेश क्षीरसागर गटाच्या बूथ समोर मिरवणूक आल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेत दोन गट पडले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पापाची तिकटी परिसरात मंडळाच्या स्वागतासाठी अनेक मंडप उभारण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या राजे क्षीरसागर यांच्याकडूनही पान सुपारी मंडप उभारण्यात आला होता.
या मंडपासमोर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले अध्यक्ष असलेल्या फिरंगाई तालीम मंडळाची मिरवणूक आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. यावेळी मंडपाच्या व्यासपीठावरील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, हातवारे आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काल उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला, तरी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
शिवेसेनेला खिंडार पडल्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि एकनाथ शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. दोघांकडूनही सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याचेच पडसाद विसर्जन मिरवणुकीमध्ये उमटले होते. कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडूनही स्वतंत्र कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनही कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या