एक्स्प्लोर
Kolhapur Municipal Corporation: एबीपीची बातमी इम्पॅक्टची हमी! फुटपाथ स्वच्छतेनंतर तसाच तुंबवून ठेवलेला कचरा महापालिकेनं अखेर उचलला
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर शहरातील कचरा उठाव गंभीर समस्या झाली आहे. दुसरीकडे, दिसेल त्या मोकळ्या जागेत शहरवासियांकडून कचरा फेकला जात असल्याने सुद्धा परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
Kolhapur Municipal Corporation
1/10

कोल्हापूर शहरात फुटपाथ अवस्था अत्यंत विदारक झाली असून झाडाझुडपांनी व्यापून गेले आहेत.
2/10

त्यामुळे मनपाकडून शहरातील मुख्य मार्गांवर फुटपाथ स्वच्छतेची मोहीम सुरु आहे.
3/10

मात्र, फुटपाथ स्वच्छता करताना कचरा मात्र काही ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुंबवून ठेवला होता.
4/10

याबाबत एबीपी माझाने गुरुवारी (7 ऑगस्ट) 'तुंबलेला कारभार' म्हणत विदारक अवस्था दाखवून दिली होती.
5/10

एबीपी माझाच्या बातमीनंतर आता कोल्हापूर मनपाला तुंबलेल्या कचऱ्याची आठवण झाली.
6/10

आज (9 ऑगस्ट) मनपा कर्मचाऱ्यांनी घंटागाडी लावून पोलिस अधीक्षक कार्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय मार्गावरील तुंबवून ठेवलेल्या कचऱ्याचा उठाव केला. त्यामुळे फुटपाथवरील कचरा उठवण्यात आल्याने मोकळा श्वास घेतला आहे.
7/10

पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा कचरा आहे त्याच ठिकाणी कुजत होता. मात्र, पाऊस जास्त झाला असता, तर तो सगळा कचरा रस्त्यावर वाहून येत दुर्गंधीला निमंत्रण देणारा ठरला असता.
8/10

कोल्हापूर शहरातील कचरा उठाव गंभीर समस्या झाली आहे. दुसरीकडे, दिसेल त्या मोकळ्या जागेत शहरवासियांकडून कचरा फेकला जात असल्याने सुद्धा परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
9/10

त्यामुळे शहरावासियांनी सुद्धा नेमून दिलेल्या जागेत कचरा टाकल्यास मनपा प्रशासनालाही मदत होऊ शकते.
10/10

कोल्हापूर शहरात यापूर्वी कचरा उठावासाठी कंटेनर दिसून येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे कंटेनर गायब झाल्याने कचरा अस्ताव्यस्त पद्धतीने पडत आहे.
Published at : 09 Aug 2025 08:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















