Kolhapur News: कोल्हापूर अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला; अपघातात एकाच मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Kolhapur Accident News: कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळलाय. महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असताना हि दुर्घटना घडली आहे.

Kolhapur Accident News: कोल्हापूर शहरातून एका दुर्घटनेची (Accident News) बातमी समोर आली आहे. यात कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळलाय. (Slab Collapses) महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या (Fire Department) नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असताना हि दुर्घटना घडली आहे. काल (30 सप्टेंबर) साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्लॅबखाली अडकलेल्या चौघांनाही बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलीय.
फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकत असताना दुर्घटना, एकाच मृत्यू (Kolhapur Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील फुलेवाडी फायर स्टेशनच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सहा जण स्लॅबखाली अडकले होते. त्यांनतर तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. अडकलेल्या सर्व सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने उशिरा उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झाले. दोन JCB च्या मदतीने पडलेला मलबा बाजूला करण्यात आला. आतापर्यंत चार जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू आहे. क्राउड मॅनेजमेंट आणि ट्राफिक डायवर्शनची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजू लक्ष्मी माजी आमदार ऋतुराज पाटील देखील उपस्थित होते.

























