एक्स्प्लोर

Nilesh Ghaywal: पवनचक्की कंपन्यांना धमकावून खोऱ्याने पैसा ओढला, राजकारण्यांशी बार्टर सिस्टीमने डिलिंग, निलेश घायवळ गुन्हेगारी क्षेत्रातील बादशाह कसा झाला?

Nilesh Ghaywal: पुण्यात गुन्हेगारी क्षेत्रात वावरणाऱ्या घायवळने काही वर्षांपासून त्याच बस्तान नगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये बसवलंय, या भागातील पवन चक्की कंपन्यांना धमकावून भरपूर पैसे कमावले आहेत.

पुणे: पुण्यातून युरोपला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलंय. यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. आश्चर्य म्हणजे पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) दिलेल्या नगरमधील पत्त्यावर तो राहत नसल्याचं समजल्यावरही त्याला तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट देण्यात आला. याच पासपोर्टचा उपयोग करून घायवळ नव्वद दिवसांचा व्हिजा मिळवून युरोपच्या टूरवर गेला आहे. (Nilesh Ghaywal)

Nilesh Ghaywal: गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही

सामान्यांना पासपोर्ट देताना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयाला आणि नगर पोलिसांना गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही. घायवळवर हत्य, अपहरण, खंडणी, शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पासपोर्ट मिळवण्यात घायवळ यशस्वी ठरला. पासपोर्टसाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यलयाकडे घायवळने २३ डिसेंबर २०१९ला अर्ज केला. मात्र आर्जवर पुण्यातील नाही तर अहिल्यानगरचा गौरी घुमटानंदी बाजार , कोतवाली , माळीवाडा रोड ४१४००१ हा पत्ता त्याने दिला. 

Nilesh Ghaywal: नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यलयाला कळवला

नगरच्या कोतवाली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या पत्त्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांना घायवळ आढळून आला नाही . त्याचबरोबर त्याच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही. कारण मुळात असा कोणता पत्त्ता अस्तित्वातच नाही. मात्र कोतवाली पोलिसांनी हा पत्ताच बनावट आहे असं पासपोर्ट कार्यलयाला न कळवता नरो वा कुंजरोवा भूमिका घेत नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यलयाला कळवला. त्याआधारे १६ जानेवारी २०२०ला घायवळला पासपोर्ट कार्यालयाकडून तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट  देण्यात आला. 

Nilesh Ghaywal: नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं

हा पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं. त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केला. Ghaywal या नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं. आश्चर्य म्हणजे पुढील पाच वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांगपत्ता देखील लागला नाही . 

Nilesh Ghaywal: त्याचा पासपोर्ट जमा केला नाही 

२०२१ मधे निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मधे घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मीळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हीजा मिळवून युरोपला फीरायला गेला‌.

Nilesh Ghaywal: दोन निरपराध नागरिकांवर हल्ले केल्यानंतर पोलिसांना जाग 

कोथरूडमध्ये घायवळ टोळीतील गुंडानी दोन निरपराध नागरिकांवर हल्ले केल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि घायवळ आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर दुचाकीला बनावट नंबरप्लेट लावल्याचा आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय. मात्र कितीही गुन्हे दाखल केले असले तरी आता घायवळचा तीन महिन्यांचा व्हिजा संपून तो भारतात कधी परत येतो याची वाट पाहण्याशिवाय पोलिसांच्या हातात काही उरलेलं नाही . 

Nilesh Ghaywal:  घायवळने काही वर्षांपासून त्याच बस्तान नगर, बीड आणि धाराशिवमध्ये बसवलंय

पुण्यात गुन्हेगारी क्षेत्रात वावरणाऱ्या घायवळने काही वर्षांपासून त्याच बस्तान नगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये बसवलंय, या भागातील पवन चक्की कंपन्यांना धमकावून भरपूर पैसे कमावले आहेत. त्यासाठी या भागातील राजकीय नेत्यांचं त्याला पाठबळ राहिलंय. त्याची परतफेड घायवळ या नेत्यांना त्यांच्या राजकारणात मदत करून करत आलाय. मात्र या अभद्र युतीची फळं मात्र सामान्य नागरिकांना भोगावी लागतायत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Chandrapur : दोस्तीती कुस्ती! शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण अन् शिवीगाळ; चक्क ईव्हीएम मशीनही फोडल्याची घटना
दोस्तीती कुस्ती! शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण अन् शिवीगाळ; चक्क ईव्हीएम मशीनही फोडल्याची घटना
Anant Garje and Gauri Garje Case: गौरी गर्जे प्रकरणात पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; पोलिसांना जबाब देताना म्हणाली, '2022 पासून...'
गौरी गर्जे प्रकरणात पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; पोलिसांना जबाब देताना म्हणाली, '2022 पासून...'
Embed widget