एक्स्प्लोर
खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल, युवा खेळाडूंकडून 78 सुवर्णांसह 256 पदकांची लयलूट
खेलो इंडियात सर्वसाधरण विजेतेपद मिळवण्याची महाराष्ट्राची ही सलग दुसरी वेळ आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदा 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्य अशी 256 पदकांची कमाई केली. हरयाणाला 200 पदकांसह दुसऱ्या आणि दिल्लीला 122 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
मुंबई : खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आसाममधील गुवाहाटी येथे ९ जानेवारी पासून सुरु असलेल्या या तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत देशातील विविध राज्यातील सुमारे साडेसहा हजार खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेत आज महाराष्ट्राच्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी करत तब्बल 78 सुवर्ण पदकांसह 256 पदकांची लयलूट केली. यात 77 रौप्य आणि 101 कास्यं पदक पटकाविली आहेत. सुरवातीपासून महाराष्ट्राच्या संघाने पदक तालिकेत निर्विवाद अव्वल स्थान राखले होते. जलतरणपटूंनी मध्ये सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही सर्वसाधारण विजेता ठरला आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. या युवा खेळाडूंना यापुढेही अशीच चमकदार कामगिरी करता यावी यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल.'
युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत 17 वर्षांखालील आणि 21 वर्षांखालील युवा खेळाडूंना आपले क्रीडानैपुण्याच्या प्रदर्शित करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरातून पूढे येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरत आहे.
स्पर्धेत महाराष्ट्रातून 590 खेळाडूंनी 19 क्रीडा प्रकारात आपल्या क्रीडा नैपुण्याची चुणूक दाखविली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने खेळाडूंकरिता उत्तम सुविधा पुरविल्या. तसेच सराव शिबिरांचे आयोजन केले. त्यामुळेच स्पर्धेत खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांचा द्विशतकी आकडा पार केला आहे.
महाराष्ट्राने जवळपास सर्वच क्रीडा प्रकारात आपला वरचष्मा राखला. महाराष्ट्रानं खो-खोत आज दुहेरी मुकुट पटकावला. 21 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अजिंक्यपद पटकावलं. मुलांच्या गटात महाराष्ट्रानं अंतिम फेरीत केरळचा 16-14 असा पराभव केला. तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकवर एक डाव आणि तीन गुणांनी मात केली. बॉक्सिंग प्रकारात महाराष्ट्रानं सहा सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या संजित सिंग, विजयदीप, सईखोम, याईपाबा मैताई आणि जयदीप रावतनं सुवर्णपदकं पटकावली. जळगावची दिशा पाटील मुलींच्या 63 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
संबंधित बातम्या
इंटरनेट सर्चमध्येही ठरला अव्वल, कोण आहे हा खेळाडू?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement