एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेची पोस्ट; सगळंच सांगितलं, म्हणाली, 'घरातील कर्ण कर्कश्य आवाज...'

Prajakta Shukre Gets Evicted from Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच गायिकेची पोस्ट चर्चेत. पोस्टमधून भावना केल्या व्यक्त.

Prajakta Shukre emotional Instagram post After big boss exit: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमधून तगडे स्पर्धकांची एक्झिट होत आहे. काल बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन झालं. बिग बॉसच्या घरातून प्राजक्ता शुक्रे या गायिकेचा प्रवास संपला. तिनं आपल्या उत्तम खेळातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  मध्यंतरी तिची आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर करण सोनावणेच्या मैत्रीची प्रचंड चर्चा झाली होती. दरम्यान, काल तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. प्रेक्षकांकडून कमी मते मिळाल्यामुळे तिला या खेळातून बाद करण्यात आलं.  तिच्या चाहत्यांना निश्चितच मोठा धक्का बसला. काहींनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, प्राजक्ताने बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच एक पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

प्राजक्ता शुक्रेनं शांत आणि संयमी भूमिका मांडून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिनं बिग बॉसच्या घरातील खेळाच्या जोरावर एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. परंतु, काल कमी मतं मिळाल्यामुळे तिला घरातून निरोप घ्यावा लागला. तिनं घरातून बाहेर पडताच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, 'गायक म्हणून सुरु झालेला प्रवास, आज तुमच्या प्रेमामुळे इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.   बिग बॉस (मराठी)च्या घरात जाण्याचे अनेक निकष असतात, पण त्यातला एक कॉमन निकष म्हणजे मनोरंजन'.

'आजवर मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करत आले आहे. घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये माझा एक आवाज  काही काळासाठी शांतता निर्माण करत होता. या गोष्टीचा मला आनंद आहे.  बाकी आपली भेट होतच राहिल, परंतु भेटीचं माध्यम वेगळं असेल...सर्वांचे खूप खूप आभार', असं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिनं ही पोस्ट शेअर करत लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Shukre (@prajaktashukre)

गायिकेनं पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बिग बॉसच्या घरात दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचे खूप आभार. तुमचा प्रत्येक व्होट, मेसेज आणि प्रत्येक शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.  बिग बॉसच्या घरातील प्रवास जरी इथे थांबत असला तरी तुमचं प्रेम कायम सोबत राहिल. आपण भेट राहूया..', असं तिनं आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकरी तसेच चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.  सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget