Kalyan News : झारखंडमधील मद्य घोटाळ्याप्रकरणी सुमित कंपनीचा संचालक अटकेत; केडीएमसीत कंपनी आधीच टेंडर? शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Kalyan News : केडीएमसीच्या (KDMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार सुमित कंपनी सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी झारखंडमधील पथकाने अमित साळुंखे याला अटक केली.

कल्याण : केडीएमसीच्या (KDMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार सुमित कंपनी सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी झारखंडमधील पथकाने अमित साळुंखे याला अटक केली. हा अटक करण्यात आलेला अमित साळुंखे शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्तीय असून तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनचा आर्थिक कणा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला होता. या कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला झारखंड पोलिसांनी मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे.
यामुळे केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी थेट आरोप करत सांगितलं की, केडीएमसीने ज्या कंपनीला घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट दिलं, ती सुमित कंपनी टेंडर मिळाल्यानंतरच स्थापन झाली होती. या कंपनीला फक्त पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकिपिंगचा अनुभव असूनही, तिला कचऱ्यासारखं महत्त्वाचं काम दिलं गेलं."
केडीएमसी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा उघड करणारच- दिपेश म्हात्रे
त्याचबरोबर, झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अडकलेल्या संचालकाच्या कंपनीला काम दिल्यामुळे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर ठेका दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे काम ठेकेदाराकडून पैसे घेण्यासाठीच दिलं गेलं असावं," असा आरोपही दिपेश म्हात्रे यांनी केला.हा ठेका रद्द करा, अन्यथा न्यायालयात धाव घेणार असा इशारा आता ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, अशा वादग्रस्त कंपनीचा ठेका तात्काळ रद्द केला जावा. अन्यथा आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि कारवाईसाठी थेट न्यायालयात धाव घेऊ. केडीएमसी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा उघड करणारच. असा इशारा हि त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे म्हणत्वाचे ठरणार आहे.
झारखंडमधील प्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत- संजय राऊत
झारखंडमधील मध्य घोटाळ्याप्रकरणी अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. झारखंडमधील एसीबीकडून अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे. अमित साळुंखे सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक असून महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला 108 नंबरच्या अॅम्बूलन्स चालवण्याचे कंत्राट देण्यात आलंय. राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला. यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केला आहे. हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केलाय. याप्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
संबंधित बातमी:























