एक्स्प्लोर

Nagpur Rain : जुलैमध्ये सरासरीपेक्षा 300 मिमी अधिक पावसाची नोंद, खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान

यंदा जुलै महिन्यातील सर्वच रेकॉर्ड तुटले असून सर्वच दिवस पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसाच्या दिवसाची नोंद सर्वाधिक झाली. यापूर्वी 678.9 मिमी पावसाची नोंद 1994 साली करण्यात आली होती.

नागपूरः यावर्षी मान्सूनचे उशीरा आमगन झाले असले तरी, पावसाळ्याच्या दोन महिन्यात आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी जुलै महिन्यात सर्वाधिकवेळा अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. मागील 10 वर्षांच्या मान्सूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जुलै अखेरपर्यंत साधारणः 400 मिमी पावसाची नोंद केली जाते. यंदा मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. नागपूर शहरात आतापर्यंत 746.9 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एवढाच पाऊस जिल्ह्यातही नोंदविण्यात आला आहे. जो सरासरी जून-जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाच्या 300 मिमी अधिक आहे. जून महिन्याच्या अखेरीस 119 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर जुलै या एकाच महिन्यात 627 मिमी  पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.

यापूर्वी 1994मध्ये 678.9 मिमी ची नोंद

जुलै महिन्यात मान्सून मधील सर्वाधिक पाऊस पडतो. या महिन्यात पावसाची सरासरी 313.7 मिमी पाऊस पडतो. दर दिवशी 10 ते 30 मिमी सरासरी पाऊस होते. तर एक दोन दिवसांचा संततधार पावसाची नोंदही होते. बंगालच्या खाडीत उत्तर पश्चिमेकडे दाब वाढल्याने मध्यभारतात पावसाची नोंद होते. साधारणतः जुलै महिन्यात 14 दिवस पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै महिन्यातील सर्वच रेकॉर्ड तुटले असून सर्वच दिवस पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसाच्या दिवसाची नोंद सर्वाधिक झाली. यापूर्वी 678.9 मिमी पावसाची नोंद 1994 साली करण्यात आली होती. 2008 साली महिन्याभरात सर्वात कमी 82 मिमी पाऊस नोंदविण्यात आला होता.

ओल्या दुष्काळाची स्थिती

जुलै महिन्यात संततधार पावसामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. नदी नाल्यांना अनेकदा पूर गेले आहेत. खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान नोंदविण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील खरीप पीक 90 टक्के खराब झाले. पुरात वाहून गेल्याने सुमारे 11 लोकांचा जीव गेला. 70 हून अधिक जनावरे दगावली आहेत. घरांचे नुकसान झाले तर अनेक रस्ते व पूल पाण्यामुळे वाहून गेले. जुलै महिन्यात झालेल्या अती पावसामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Nagpur Rain : मुसळधार पावसाने नागपूरकरांची तारांबळ, पुढील दोन दिवसही 'यलो अलर्ट'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priya bapat and Umesh Kamat: ' उमेशने मला जवळ घ्यावं अन् ..'; प्रिया बापटकडून पर्सनल गोष्ट शेअर, नात्यातील गोडवा कसा टिकवाल?
' उमेशने मला जवळ घ्यावं अन् ..'; प्रिया बापटकडून पर्सनल गोष्ट शेअर, नात्यातील गोडवा कसा टिकवाल?
Virat Kohli Flying Kiss Anushka Sharma : भर मैदानात विराट कोहलीचा अनुष्कासाठी तो फ्लाईंग किस अन्....; मालकीण अनन्या बिर्ला आली मध्ये, नेमकं घडलं काय?
भर मैदानात विराट कोहलीचा अनुष्कासाठी तो फ्लाईंग किस अन्....; मालकीण अनन्या बिर्ला आली मध्ये, नेमकं घडलं काय?
Lord Hanuman Favourite Zodiac Signs : भगवान हनुमानाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; दु:ख असो वा संकट, मोठ्ठ्या अडचणीही दूर करतात बजरंगबली
भगवान हनुमानाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; दु:ख असो वा संकट, मोठ्ठ्या अडचणीही दूर करतात बजरंगबली
Ashok Kharat:अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Ashok Kharat:अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Embed widget