Joker -2 : जोकिन फीनिक्सच्या मिठीत लेडी गागा; जोकर-2 च्या दिग्दर्शकाच्या पोस्टने चाहत्यांचे वेधले लक्ष
Joker -2 : 'जोकर 2' ला अधिकृतपणे 'जोकर: फोली अ ड्यूक्स' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा जोकरच्या भूमिकेत आणि लेडी गागा 'हार्ले क्विन'च्या भूमिकेत येत आहे.
![Joker -2 : जोकिन फीनिक्सच्या मिठीत लेडी गागा; जोकर-2 च्या दिग्दर्शकाच्या पोस्टने चाहत्यांचे वेधले लक्ष Joker 2 Movie Updates Joaquin Phoenix And Harley Quinn Aka Lady Gaga New Photo Joker -2 : जोकिन फीनिक्सच्या मिठीत लेडी गागा; जोकर-2 च्या दिग्दर्शकाच्या पोस्टने चाहत्यांचे वेधले लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/b3723a689899185d878f20c63ad189461707996469280290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Joker -2 : 2019 मध्ये आलेल्या अमेरिकन सायको-थ्रीलर चित्रपट जोकरने (Joker Movie) बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता यावर्षी जोकर-2 (Joker-2) चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटातील फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये जोक्विन फीनिक्स आणि लेडी गागा रोमान्स करताना दिसत आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर #Joker2 ट्रेडिंग होऊ लागला आहे.
'जोकर 2' ला अधिकृतपणे 'जोकर: फोली अ ड्यूक्स' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा जोकरच्या भूमिकेत आणि लेडी गागा 'हार्ले क्विन'च्या भूमिकेत येत आहे.
दिग्दर्शकाने दाखवली झलक
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दिग्दर्शक टॉड फिलिप्सने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना ऑन स्क्रीन झलक दाखवली. या फोटो फिनिक्स जोकरच्या व्यक्तीरेखेत दिसत आहे. तर, लेडी गागा हार्लेच्या भूमिकेत असून जोकरच्या मिठीत आहे.
View this post on Instagram
टॉड फिलिप्सने 14 फेब्रुवारीच्या रात्री इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यात तीन फोटो आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आशा आहे तुमचा दिवस प्रेमाने भरलेला असेल.' पहिल्या चित्रात जोक्विन आणि लेडी गागा दिसत असल्याचे त्याने म्हटले.
‘जोकर 2’ साठी जोक्विन फिनिक्सला तब्बल 367 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. 2007 साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकर या पात्राला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी हिथलाही ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर या पात्रावर आधारीत चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या सायकोलॉजिकल थ्रीलर चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. भारतातही हा चित्रपट सुपरहिट ठरला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)