(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हृतिक रोशनला का घ्यावा लागतोय कुबड्यांचा आधार? आजोबांचा किस्सा सांगत पोस्टमध्ये सांगितल्या पुरुषांच्या वेदना
Hrithik Roshan : हृतिक रोशन सध्या दुखापतग्रस्त असून त्याने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे.
Hrithik Roshan Viral Pics : अभिनेता हृतिक रोशनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमुळे चाहते चिंताग्रस्त झाले आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) या फोटोत कुबड्यांच्या आधारे उभा असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय, त्याच्या कंबरेला पट्टा लागला आहे. फायटर चित्रपटामुळे चर्चेत असणाऱ्या हृतिकने या फोटोसह मोठी पोस्ट लिहिली आहे.
हृतिक रोशनची कंबर दुखावली आहे.त्यामुळे डॉक्टरांनी त्याला कुबड्यांच्या आधारे चालण्याचा सल्ला दिला आहे. त्याने स्वत: ही माहिती दिली आहे. फोटोमध्ये हृतिक पायजमा आणि टी-शर्ट घातलेला दिसत आहे. कुबड्यांच्या आधाराने उभा राहून त्याने आरशात सेल्फी काढला. त्यासोबत लिहिले आहे की, 'तुमच्यापैकी किती जणांना व्हीलचेअर किंवा कुबड्यांची मदतीची गरज होती आणि त्यावेळी तुम्हाला कसे वाटले?'
View this post on Instagram
हृतिकने सांगितला आजोबांचा किस्सा
हृतिकने आपल्या पोस्टमध्ये आजोबांशी निगडीत किस्सा सांगितला आहे. हृतिकने सांगितले की, एकदा आजोबांनी एअरपोर्टवर व्हीलचेअर घेण्यास नकार दिला. त्यांना अनोळखी लोकांसमो आपण शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दाखवायचे नव्हते. हृतिकने आजोबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाला,''ही फक्त एक जखम आहे आणि तुमच्या वयाशी काहीही संबंध नाही. यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही, परंतु तुमची जखम लवकर बरी होईल. पण ते मान्य करत नव्हते. त्यांच्यातील भीती लपवण्यासाठी ते कसे मजबूत आहेत हे दाखवण्यासाठी धडपड करत होते. हे पाहून मला वाईट वाटले. मात्र, माझ्यासाठी त्यांची ही धडपड अनाकलनीय होती.
हृतिक रोशनने पोस्टमध्ये पुढे म्हटले की, 'मी त्यांना खूप समजावले की त्याच्या दुखापतीमुळे त्याला व्हीलचेअरची गरज आहे. म्हातारपणामुळे नाही. तरीही त्यांनी नकार दिला. त्यांची पर्वा न करणाऱ्या अनोळखी लोकांसमोर आपली मजबूत प्रतिमा दाखवण्यासाठी त्याने हे केले. यामुळे त्याच्या वेदना आणखी वाढल्या आणि बरे होण्यासही बराच वेळ लागला. हे सगळे एका धारणेने होते. पुरुष हे मजबूत असतात अशी धारणा असते, त्यातून हे उद्भवत असल्याचे हृतिकने म्हटले.
मजबूत असणे म्हणजे काय?
हृतिकने म्हटले की, तुम्ही कधी विचार करत असाल की जवानांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागत नाही. पण, त्यांना वैद्यकीय कारणांनी याची आवश्यकता भासते. पुरुष मजबूत असतात, त्यांना कसल्या आधाराची गरज नसते असे तुम्हाला वाटत असेल तर मी याला मुर्खपणा असल्याचे म्हणेल. एखादी कुबडी किंवा व्हीलचेअर तुमची प्रतिमा बदलू शकत नाही, असेही हृतिकने म्हटले.