एक्स्प्लोर

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला 'ती' गोष्ट खटकली?; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टायमिंग ठरतंय चर्चेचा विषय, 5 महत्त्वाची कारणं

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 

स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती-

पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर आली. तसेच पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

काय असू शकतात हल्ल्यामागचे हेतू? 

1. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्सचा भारत दौरा 

- आम्ही कधीही काहीही करु शकतो हा हल्ल्याद्वारे अमेरिकेला इशारा
- व्हान्स यांच्यासाठी अमेरिकेचे सी-१७ ग्लोबमास्टर विमाने
- अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांवर एक प्रकारे मात करण्याचा प्रयत्न

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा 

- काश्मीरचा वाद मिटला नाही हा भारत-सौदी अरेबियाला संदेश
- मित्र देश सौदी अरेबिया भारताच्या जवळ जातोय हे पाकिस्तानला खटकले
- सौदी अरेबिया पाकला भीक देईना, भारतासोबत मात्र अब्जावधींचे करार

3. काश्मीरमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ 

- 'काश्मीरमध्ये सर्व सुरळीत होतंय' हे वास्तव मोडण्याचा प्रयत्न
- यंदा साडे तीन महिन्यांत 2.35 कोटी पर्यटकांची भेट
- 2023ला 2.11 कोटी तर 2022 मध्ये 1.88 कोटी पर्यटकांची भेट
- पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न

4. आगामी अमरनाथ यात्रेला इशारा 

- अमरनाथ यात्रा पहलगाममधूनच सुरू होते
- यंदा 3 जुलैपासून यात्रा, यात्रेची सध्या तयारी
- यात्रेकरुंच्या मनात भीती निर्माण करण्याचा हेतू

5. पाकच्या लष्करप्रमुखांच्या बोलण्यातून संकेत 

-लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले,काश्मीर म्हणजे गाझा
- मुनीर म्हणाले, हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांचे,रीति रिवाज,संस्कृती,विचार वेगळे
- मुनीर म्हणाले, पाकसाठी पूर्वजांनी बलिदान दिले,त्याचे रक्षण करणे आम्हास ठाऊक
- मुनीर म्हणाले, काश्मीर आमच्या गळ्याची नस होती,आहे आणि असेल.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू-

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय.   डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत. 

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा क्रूर हल्ला, VIDEO:

संबंधित बातमी:

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पतीला मारताचं पत्नी म्हणाली, मलाही मारुन टाका, दहशतवादी म्हणाला...; हृदय पिळवटून टाकणारा थरार

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी कॅमेरात कैद; अंगावर काटा आणणारे PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget