Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पतीला मारताचं पत्नी म्हणाली, मलाही मारुन टाका, दहशतवादी म्हणाला...; हृदय पिळवटून टाकणारा थरार
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पल्लवी म्हणाली की, मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका...यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा...ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असं दहशतवादीने सांगितले, असं पल्लवी यांनी सांगितले.
मंजुनाथ अन् पल्लवीचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.
J&K : पहलगाम में आतंकी हमले में मारे गए कर्नाटक के मंजूनाथ की आखिरी Video 💔
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 22, 2025
पत्नी पल्लवी ने एक चैनल को बताया– "मैंने आतंकियों से कहा, मेरे पति को मार दिया, मुझे भी मार दो"
इस पर आतंकी बोले– "तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो" pic.twitter.com/ZlqUYiNEwg
महाराष्ट्रातील आतापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू-
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
#WATCH | Jammu & Kashmir | A group of tourists with a schedule to visit Pahalgam today, terminate the plan and are now returning to Delhi in view of #PahalgamTerroristAttack https://t.co/bCZmHdlOAm pic.twitter.com/lKjPe6E7AY
— ANI (@ANI) April 23, 2025
























