Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन गाड्यांचा चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू
Samriddhi Highway Accident Updates: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून दोन गाड्यांचा पुरता चेंदामेंदा झाला आहे.
Samriddhi Highway Accident: जालना : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात (Accident Updates) झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील (Jalna) कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात (Accident Latest Updates) झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, चारजण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपूरहुन (Nagpur News) मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या कारला राँग साईडनं येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.
जालना (Jalna News) जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. एका जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी अकराच्या सुमारास नागपूरवरून मुंबईकडे जाणारी आर्टिका आणि राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती कळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत जखमींना ॲम्बुलन्समधून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं. धर्मन यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या आर्टिका गाडीला क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आला. अपघातातील चारपैकी तिघांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रेफर करण्यात आलं आहे.
अपघातातील मृत व्यक्तींची नावं
- फय्याज शकील मंसुरी
- फैजल शकील मंसुरी
- अल्थमेश मंसुरी (सर्व रा. मालाड मुंबई पूर्व, आर्टिका कार क्र. MH 47 RP 5478 मधील)
- प्रदिप लक्ष्मण मिसाळ वय 38 वर्ष रा. पिंपळनांव ता. दे. राजा.
- संदीप माणीकराव बुधवंत वय 30 वर्ष (कार चालक)
- विलास सुदान कायंदे वद 28 वर्ष रा. उरकीड ता. दे.राजा (स्वीफट कार का. MH 12 MF 1856 मधील इलम
नेमका कसा झाला अपघात?
समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन गाड्यांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात आर्टिका गाडी जी नागपूरवरून मुंबईला जात होती. या गाडीची राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीवर जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.