एक्स्प्लोर

Maratha Reservation : पंतप्रधान मोदींना गरिबांची गरज नाही हे कळलं, आमची लढाई आम्हीच लढू; जरागेंचा एल्गार

Maratha Reservation : पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाचा कोणताही उल्लेख न केल्याने मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जालना :  पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) आता गरिबांची गरज नाही हे कळलं आहे. आता आमची आरक्षणाची लढाई आम्हीच लढू असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटले. शिर्डी दौऱ्यावर (Shirdi Tour) आलेले पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाचा कोणताही उल्लेख न केल्याने मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये (Maratha Reservation) नाराजी पसरली आहे. उपोषणावर असलेल्या जरांगे यांनीदेखील पंतप्रधानांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. 

मनोज जरांगे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान मोदी हे सरकारला सांगू शकत नसतील तर तेथून दिल्लीतून काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांचे प्रश्न सोडवतील असा गैरसमज होता. पण मोदी बोलले नाही म्हणून बर झालं. त्यामुळे ते गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान आहेत हा गैरसमज दूर झाला असल्याचेही मनोज जरांगे यांनीी म्हटले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरिबांच्या मुलांसाठी विनंती केली होती. मात्र याविषयी नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावर भाष्य केले नाही. मराठा समाजाने ठरवले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येऊ दीले नसते. पंतप्रधान मोदी बोलले नाही हे बरे झाले. यावरून समजते की त्यांना आता गोरगरीबांची गरज नाही. त्यामुळे आम्ही आता ही लढाई आम्हीच लढणार असल्याचा एल्गार जरांगे यांनी केला. 

माझ्या नवऱ्याला काही झालं तर त्याला सरकारचं जबाबदार राहील', जरांगेंच्या पत्नीने दिला सरकारला इशारा

मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे आता त्यांच्या परिवाराची चिंता वाढलीये. 'आरक्षणाचा  मुद्दा तात्काळ निकाली काढावा अन्यथा आपल्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील' असा इशारा मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्याने काहीतरी मार्ग निघेल अशी आशा मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर एकतर आता माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या तपासणी साठी आलेले डॉक्टरांचे पथक माघारी....

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी एक डॉक्टरांचे पथक गावात दाखल झाले. यावेळी या पथकाच्या डॉक्टरांकडून मनोज जरांगे यांना तपासणी करण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगे ही विनंती नाकारत आरक्षण हाच आपल्यावर उपचार असल्याचं म्हटले.  बुधवारी, संभाजीराजे छत्रपती यांच्या आग्रहास्तव जरांगे यांनी पाणी घेतलं होतं. मात्र आज सकाळपासून त्यांनी पाणी बंद केलंय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
RBI : आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Priyanshu Kshatriya Death : नागपूरमध्ये 'झुंड' फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची निर्घृण हत्या
Rohit Sharma Fitness | हिटमॅनचा 'फिट अँड फाइन' लुक, १० किलो वजन घटवले Special Report
Gun License Controversy: वादातले गुंडे, राजकारण उदंड; चक्रावणारी गुंतागुत Special Report
TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : 08 OCT 2025 : ABP Majha : Maharashtra News
Maratha Reservation Row | Jarange-Bhujbal पुन्हा जुंपली! Maratha GR, Beed आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
RBI : आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Embed widget