Manoj Jarange: 'शिंदे नामधारी प्रमुख, पक्ष फोडाफोडी करून सत्ता आणू शकतो तो....', मनोज जरांगेंची फडणवीसांच्या राजीनामा अन् निवृत्तीवर प्रतिक्रिया
Manoj Jarange: मी आरक्षणात अडथळा आणला असं जर एकनाथ शिंदे म्हणाले, तर मी त्याचवेळी राजीनामा देईन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे, त्यावर आज पुन्हा एकदा जरांगेंनी भाष्य केलं आहे.
Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलनकर्ते आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याकडून केली जात आहे. 'एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत', असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन असं म्हटलं त्यावर आज पुन्हा जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'ते कसं सिध्द होईल, कोणीही असेल तर तो कसा खरं सांगेल, सत्तेत असेल तर कसं खरं म्हणू शकतो, कोणीच तसं म्हणू शकत नाही. ते तिघं एकत्र आहेत. ते एकमेकांच्या विरोधात बोलूच शकत नाहीत. खरं असो किंवा खोटं असो कोणी बोलणार नाही. पण, जर देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर ते एका दिवसात आरक्षण देऊ शकतात. त्यांनी जर नाही ठरवलं तर जसं एसटीतून धनगरांना शब्द देऊन १० वर्ष झाले, अद्याप आरक्षण दिलं नाही आणि पुढंही देणार नाहीत तसंच मराठ्यांना देखील करतील, त्यांना वाटलं तर देतील नाहीतर देणार नाहीत, असंही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी यावेळी म्हटलं आहे.
एक साधं उदाहरण सांगतो, जर एकनाथ शिंदेंना मोकळीक असती तर नोंदी शोधण्याचा रेकॉर्ड का बंद केला. यापुढे शिंदे, फडणवीसांनी मनावर घेतलं तर राज्यात मराठ्यांचा रेकॉर्ड सापडू शकतो. त्यांनी तो शोधणंही बंद केलं आहे. त्याच्यात मालक कोण आणि नामधारी कोण ते लक्षात येतं. सर्वांना माहिती जो फोडाफोडी करून पक्ष आणू शकतो, सत्ता बदल करू शकतो, तोच मेन असणार ना, असं कसं होऊ शकतं. ते ठरवतात कोणाचं काय करायचं असंही पुढे मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी म्हटलं आहे. सरकार आरक्षण देण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे आपणही तयार राहायचं त्यांना सत्ता मिळू द्यायची नाही, असंही ते पुढे म्हणालेत.
3 गुन्ह्यांच्या तपासासाठी गेवराई पोलिसांची नोटीस
मनोज जरांगे पाटील यांना 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. जानेवारी 2024 मध्ये जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) गेवराई पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंद होते. दरम्यान, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांचे गुन्हे शासन मागे घेणार आहे. त्यासाठी 31ऑगस्टपर्यंत या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाचा भाग म्हणून ही नोटीस दिली गेल्याची माहिती गेवराई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या अनेक सभा रात्री उशीरा, मध्यरात्री झाल्या तर काही ठिकाणी त्यांच्या आवाहनावरुन रास्ता रोको आंदोलन झाल्याने, जरांगे पाटलांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. गेवराई तालुक्यात धोंडराई येथील सभा, गेवराईतील सभा आणि मुंबईला जाताना मादळमोही येथील सभा यामुळे त्यांच्यावर 3 गुन्हे नोंद होते.