एक्स्प्लोर

Ajit Pawar : निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान, कशाचा बोडक्याचा?; सरकारी जाहिरातीवरून अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar : अजित पवार आज जालना दौऱ्यावर असून, यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. 

Ajit Pawar Shinde-Fadnavis Government : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. विधानपरिषद आणि कसब्यातील पराभवानंतर शिंदे फडणवीस धास्तावले असून, त्यामुळेच हजारो कोटी रुपयांचा खर्च करून सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. तर या सरकारचा एकच धंदा सुरु असून, सगळीकडे  निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान लावण्यात येत आहे. तर कशाचा वेगवान बोडक्याचा...असा खोचक टोला अजित पवारांनी सरकारला लगावला आहे. अजित पवार आज जालना दौऱ्यावर असून, यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, या सरकारने सध्या एकच धंदा लावला आहे. सगळीकडे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान लावले असून, कशाचा वेगवान बोडक्याचा? असे पवार म्हणाले. तर काय गतिमान, त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांची दातखीळ बसते. याचं काय झाले आहे की, याचं सरकार येऊन नऊ महिने झाले. त्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या. त्यात कशीबशी एक जागा आली. ती सुद्धा शिवसेनेचा उमेदवार घेतला. बाकी सर्वकडे त्यांचा पराभव झाला असल्याने यांचे डोळे उघडले असल्याचा टोला अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. 

'आनंदाच्या शिधा'वरून टीका...

यावेळी बोलताना अजित पवार यांनी आनंदाच्या शिधावरून देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं. या सरकराने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. ज्यात एक किलो रवा, साखर,चणाडाळ आणि तेल या कीटमध्ये आहे. या चार किलो काय होणार आहे. यांनी स्वतःच कुटुंबाचे नियोजन या चार किलोच्या आनंदाच्या शिधातून करून दाखवले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचं चित्र

दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देखील अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी हतबल झाला आहे, गारपीट पडतेय, अवकाळी पाऊस पडतोय, कांद्याला भाव नाही, सोयाबीनची देखील अशीच अवस्था आहे. त्यात मोसंबी, द्राक्षे, केळी आणि संत्रा अशा पिकांचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. या चक्रव्यूहात आमचा शेतकरी अडकला आहे. त्याला मदत करायला हवी. पण सरकार फक्त मदत जाहीर करू म्हणून सांगत असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र असल्याचं अजित पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ajit pawar : पेपर उघडला की यांचांच फोटो, शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा? अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024Zero Hour : 40 हजार कोटींची बिलं थकली, कंत्राटदारांवर आंदोलनाची वेळZero Hour Nagpur : बौद्ध लेणींच्या बचावासाठी एकवटले संभाजीनगरकरABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget