Ajit pawar : पेपर उघडला की यांचांच फोटो, शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा? अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Ajit pawar : अवकाळी पावसामुळं (Rain) महाराष्ट्रात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
Ajit pawar : अवकाळी पावसामुळं (Rain) महाराष्ट्रात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केलं. सध्या कापूस, सोयाबीनला दर नाही. आज कांदा विकून खिश्यातले पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे पवार म्हणाले. शेतकरी संकटात असताना सरकारचा एकद धंदा सुरु आहे, तो जाहीरातबाजीचा. सरकार म्हणतंय 'निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान'. पण काय गतीमान? असा सवाल अजित पवार यांनी केला. पेपर उघडला की आहेच यांचा फोटो, त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा? असे म्हणत जाहीरातबाजीवरुन अजित पवारांनी सरकारवर टीका केली.
मागणी करुनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही
चक्रव्युहात अडकलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी आम्ही सातत्यानं सभागृहात केली. अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं नसल्याचे अजित पवार म्हणाले. सरकार सांगत आहे मदत जाहीर करु पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अर्थसंकल्पात मोठ्या मोठ्या घोषणा केल्याचे अजित पवार म्हणाले. सरकारमधील नेते स्वत:चा उदोउदो करत आहेत. आम्ही देखील सरकारमध्ये काम केलं आहे. पण आम्ही अशी जाहीरातबाजी केली नसल्याचे अजित पवार म्हणाले. मी जर रोज पेपरमध्ये जाहीरात दिली तर लोक म्हणतील काम करायला निवडून दिले की, जाहीरात द्यायला असेही अजित पवार म्हणाले.
गरिबांना कुटुंब चालवावे कसे?
देशात रोज महागाई वाढत आहे. गरिबांना कुटुंब चालवावे कसे? असा प्रश्न अजित पवारांनी केला. यावेळी अजित पवार यांनी जाहीरातबाजीवरुवन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. वेगवान निर्णय केल्याची जाहीरात पेपरला देतात. मात्र, कोणत्याही प्रकारे वेगवाने निर्णय होत नसल्याचे अजित पवार म्हणाले. जालना येथे अजित पवार यांच्या हस्ते कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना तिर्थपुरी येथील 60000 लिटर प्रति दिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अडसाली ऊस घ्यायला सुरुवात करा, शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांना आता मानसिकता बदलावी लागेल. तुमच्या इकडे ऊसाला कमी दर आहे. तुम्ही अडसाली ऊस घ्यायला सुरुवात करा, तुम्हाला जास्त दर मिळेल असे अजित पवार म्हणाले. अडसाली ऊस केला तर तुमच्या ऊसाचे टनेज वाढेल असेही अजित पवार म्हणाले. 86032, 8005 किंवा 10001 या जातीच्या ऊसाची लागवड करावी असे आवाहन अजित पवार यांनी केलं. आधुनिक पद्धतीनं शेती कशी करायची गरज असल्याचे पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: