एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जालना लाठीमार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Jalna : दोषी नसतांना पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यासाठी सुरु असलेल्या उपोषणावर पोलिसांनी लाठीमार केला होता. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटल्यावर सरकारने सावध भूमिका घेत या प्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, पोलिसांवर झालेली कारवाई मागे घेऊन त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. दोषी नसतांना पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. 

जालना येथील उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचा आरोप झाला होता. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले होते. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरु झाली. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटले आणि मराठा समाज रस्त्यावर उतरला. त्यानंतर सरकारने याची गंभीर दखल घेतली. तसेच, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. 

दरम्यान, याचवेळी लाठीमार प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली. त्यानंतर सरकराने जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. सोबतच, पोलीस उपाधीक्षक राहुल खाडे, डीवायएसपी मुकुंद आघाव आणि गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, दोषी नसतांना हि कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत, कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते गजानन दराडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. 

उपोषण कर्त्यांची मागणी? 

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलना दरम्यान पोलीसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील दोषी नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे हे निलंबन परत घेवुन त्यांना सन्मानाने कर्तव्यावर रुजु करावे. जखमी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पगारी रजा मंजुर करावी. तसेच पुढील उपचारार्थ प्रत्येकी रुपये 5 लक्ष देण्यात यावे. या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. तसेच, आमरण उपोषणा दरम्यान काही बरे वाईट झाले, तर याची सर्वस्व जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह राज्यातील सर्व आमदार, खासदार व जिल्हाधिकारी यांच्यावर असेल," असे निवेदनात म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, शरद पवारांची प्रतिक्रिया; लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करा, उदयनराजेंची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Embed widget