Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिकमत उढाण पक्ष प्रवेश करून शिवबंधन बांधणार आहेत. हिकमत उढाण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगी विधानसभा मधून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
जालना: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. उद्या (गुरूवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हिकमत उढाण (hikmat udhan) पक्ष प्रवेश करून शिवबंधन बांधणार आहेत. हिकमत उढाण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या विरोधात घनसावंगी विधानसभा मधून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, शिवसेनेचे सह- संपर्कप्रमुख हिकमत उढाण (hikmat udhan) यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये हिकमत उढाण घनसावंगी मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
घनसावंगी मतदारसंघाचे सध्याचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे आहेत तर त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे हिकमत उढाण (hikmat udhan) हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याची आधीपासूनच चर्चा सुरू होती. हिकमत उढाण (hikmat udhan) आतापर्यंत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत कार्यरत होते, मात्र मागील काळात शिवसेना (UBT) महाविकास आघाडीत सामिल झाल्याने घनसावंगी मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
अशातच विद्यमान आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदाराला संधी देण्यात येईल.त्यामुळे पुन्हा एकदा घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून राजेश टोपे (Rajesh Tope) निश्चित केल्याचे मानले जात आहे, अशा परिस्थितीत हिकमत उढाण यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची तयारी केली आहे.
2019 मध्ये उध्दव ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत होती, त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून हिकमत उढाण व आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राजेश टोपे हे एकमेकांसमोर उभे होते, त्यावेळी राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा विजय झाला होता, हिकमत उढाण (hikmat udhan) यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता. यावेळी त्यांनी मोठी तयारी केली आहे.
हिकमत उढाण शिंदे यांच्या शिवसेनेत 10 तारखेला कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर हिकमत उढाण यांना महायुतीकडून तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून हिकमत उढाण यांना तिकीट मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.