एक्स्प्लोर

Jalgaon News : धावत्या एसटी बसचा रॉड तुटला, चालकामुळे अपघात टळला; पर्यायी बसची मागणी करणाऱ्या प्रवाशांना एसटी अधिकाऱ्याची शिवीगाळ

Jalgaon ST Bus News : बसमध्ये बिघाड झाल्याने पर्यायी एसटी बस मागणाऱ्या प्रवाशांना एसटी अधिकाऱ्याने शिविगाळ केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जळगाव :  धावत्या जळगाव बामृड बसचा रॉड तुटल्याने बस अपघात (ST Bus Accident) झाला. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, पुढील प्रवासासाठी पर्यायी बस मागणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिविगाळ करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी या एसटी बसमधील (ST Bus) प्रवाशांनी केली. 

जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांब्रुड गावासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव डेपोची बस निघाली होती. ही बस धावत असताना शिरसोली गावाजवळ तिच्या पुढील चाका जवळचा रॉड तुटल्याने बस खाली झुकली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र, समयसूचकता दाखवत अनुभवी असलेल्या चालक हेमंत पाटील यांनी बस कशी तरी रस्त्याच्या बाजूला लावण्यास यश मिळविले. मोठा अनर्थ टाळल्याने  बसमधील प्रवाशांनी चालक पाटील हे आमच्या साठी देवदूत ठरल्याच्या प्रतिक्रिया दिली आणि त्यांचं टाळ्या वाजून आभार मानले. 

बस नादुरुस्त होऊन बराच वेळ झाला तरी दुसरी बस मिळत नसल्याने बस मधील काही प्रवाशांनी एस टी मंडळातील वरिष्ठ अधिकारी यांचे मोबाईल नंबर मिळवीत त्यांच्याशी संपर्क केला. प्रवाशी थेट आपल्याशी संपर्क करत असल्याने  मनोज तिवारी नावाच्या वाहतूक अधिकाऱ्याने रागाच्या भरात चालक  हेमंत पाटील यांना  प्रवाशांना आपला नंबर का दिला म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि प्रवाशांनाही अरेरावीची भाषा केल्याचा आरोप  प्रवाशी महिलांनी केला आहे.
या घटनेनंतर एसटी मंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली, मात्र ती देखील काही अंतर गेल्यावर त्यात बिघाड झाला. एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांनी याकडे आणि अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे जातीने लक्ष घालून त्यांना ठिकाणावर आणावे नाही तर आम्हीच त्याला ठिकाणावर आणू असा इशारा दिला आहे. 

समयसूचकता दाखवत जळगाव बांबरुड बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवणारे बस चालक हेमंत पाटील यांचा प्रवाशांनी सत्कार करून त्यांना सन्मानित केले आहे. एसटी मंडळाने ही त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना शिवीगाळ करणाऱ्या अधिकारी वर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे

 या घटनेसंदर्भात जळगाव एस टी मंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जग्नोर यांना विचारले असता त्यांनी प्रवाशांच्या मागणी नुसार त्वरित दुसरी बस उपलब्ध करून दिल्याच सांगितले. त्याच वेळी वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी हे जबाबदार अधिकारी असून ते शिव्या देऊ शकणार नाहीत, असे म्हटले. त्यांनी शिव्या दिल्या असतील तर प्रवाशांनी पुरावे द्यावे अशी भूमिका मांडली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget