एक्स्प्लोर

Modi 3.0 Cabinet : रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी, खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

PM Modi Oath Taking Ceremony : खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. यावर खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

PM Modi Oath Taking Ceremony : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) रक्षा खडसे (Raksha Khadse) या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या असून त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे आज मंत्रिपदाची शपथ घेतील. 

या शपथविधीसाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)हेदेखील दिल्लीला पोहोचले आहेत. खडसेंचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रक्षा खडसे यांचे अभिनंदन केले आहे. महायुती म्हणून आम्ही देखील रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्याचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

रक्षा खडसे मुक्ताईनगरच्या सूनबाई

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचा आनंद आहे. राज्यात निवडणूक टफ झाली, पण जळगावच्या दोन्ही महायुतीच्या जागा आमच्या मोठ्या फरकाने निवडून आल्या. जळगाव जिल्हा हा आजही महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले. रक्षा खडसे यांचे अभिनंदन, रक्षा खडसे आमच्या मुक्ताईनगरच्या सूनबाई आहेत.  मुक्ताईनगरमध्ये आता विकासाचा रथ धावणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

शरद पवार गटाचे कार्यकर्ते पेढे भरवताय हा आनंद

ते पुढे म्हणाले की, स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न आता मार्गी लागतील, असा आम्हाला विश्वास आहे. केंद्रात आमचे सरकार आणि राज्यात पण आमचे सरकार आहे. राज्यात चार महिन्यांनी पुन्हा आमचेच सरकार येणार आहे. मोदींचे काम सर्वांना माहीत आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे.  स्थानिक राजकीय समीकरण बघता नाराजी होती, पण आम्ही मोदींसाठी काम केले. मुक्ताईनगरमध्ये आनंद आहे, असे त्यांनी म्हटले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पेढे भरवताय हा आनंदाचा विषय आहे. एकनाथ खडसे शपथविधीला गेले आहेत. तो त्यांचा पारिवारिक संबंध आहे, असा निशाणा त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर साधला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: नरेंद्र मोदी संध्याकाळी 7.15 वाजता शपथ घेणार, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

PM Modi Oath Ceremony : सुनबाईला मंत्रि‍पदाची लॉटरी, सासरे एकनाथ खडसेंचे डोळे पाणावले; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
×
Embed widget