एक्स्प्लोर

PM Narendra Modi Oath Live Updates: पुणेकरांचा नेता मोदी कॅबिनेटमध्ये, रक्षा खडसे, रामदास आठवले, प्रतापराव जाधव यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी

Narendra Modi Oath Taking Ceremony live streaming : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. शपथविधीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह

LIVE

Key Events
PM Narendra Modi Oath Live Updates: पुणेकरांचा नेता मोदी कॅबिनेटमध्ये, रक्षा खडसे, रामदास आठवले, प्रतापराव जाधव यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी

Background

Narendra Modi Oath Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आज राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनीपद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली असून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यासह मोदी कॅबिनेटमधील मंत्र्यांनीही शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव पंतप्रधान आहेत, जे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग तीन निवडणुकांनंतरही पंतप्रधान पदावर विराजमान राहिले.

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी कॅबिनेट 3.0 मधील पहिले मंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

जे.पी.नड्डा (JP Nadda), शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman), कुमारस्वामी (Kumaraswamy), मनोहर लाल (Manohar Lal), डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar) या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

 

21:49 PM (IST)  •  09 Jun 2024

PM Modi Swearing-In Ceremony Live : या नेत्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : कर्नाटकच्या तुमकूरचे खासदार वी सोमन्ना, सर्वात श्रीमंत खासदार आणि टीडीपी नेते डॉ. चंद्रशेखर पन्नास्वामी, उत्तर प्रदेशच्या आग्राचे खासदार एसपी सिंह, बंगळुरु उत्तरच्या खासदार शोभा करंदलाजे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

21:55 PM (IST)  •  09 Jun 2024

PM Narendra Modi Oath Live : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

21:37 PM (IST)  •  09 Jun 2024

PM Narendra Modi Oath Live : या नेत्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : भाजप नेते शंतनू ठाकूर, बी.एल. वर्मा, शोभा करंदलाजे, पंकज चौधरी, एस.पी. सिंह बघेल, भाजप नेते कृष्णा पाल आणि कीर्तीवर्धन सिंह यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

21:36 PM (IST)  •  09 Jun 2024

PM Modi Oath Ceremony Live : अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

PM Modi Oath Ceremony Live : अपना दल (सोनेवाल) प्रमुख आणि मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असून मागील सरकारमध्ये मंत्री होत्या.

21:33 PM (IST)  •  09 Jun 2024

PM Modi Oath ceremony Live : रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget