एक्स्प्लोर

Nepal Bus Accident : लहानपणीच वडील गेले, कोरोनात आजी-आजोबांना गमावलं, आता नेपाळ बस दुर्घटनेत आईचाही अंत, वरणगावचा अंकित एकटा पडला

Nepal Bus Accident : नेपाळमधे बस नदीमध्ये कोसळून जळगावच्या भुसावळ तालुक्यातील सुमारे पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यामुळे भुसावळवर शोककळा पसरली आहे.

जळगाव : बालपणी वडील गमावले, त्यानंतर कोरोनात (Corona) आजी-आजोबा गमावलेल्या वरणगाव (Varangaon) येथील अंकित जावळे (Ankit Jawle) या तरुणाची आई नीलिमा जावळे (Nilima Jawle) यांचा देखील  नेपाळ बस दुर्घटनेत (Nepal Bus Accident) मृत्यू झाल्याने अंकित जावळे हा तरुण घरात आता एकटा पडला आहे.  

नुकतीच नेपाळमधे बस नदीमध्ये कोसळून त्यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील पंचवीस जणांचा मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यामध्ये वरणगाव येथील अंकित जावळे या तरुणाच्या आईचा देखील समावेश होता. वरणगाव येथील जावळे वाड्यातील एकूण आठ जण या अपघातात मरण पावले आहेत. 

वरणगाव 80 जण गेले होते नेपाळला

अयोध्या दर्शन घेण्याबरोबर नेपाळमधील पशूपती नाथांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी वरणगाव येथील जवळपास 80  जण दोन बसच्या माध्यमातून नेपाळकडे निघाले होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिर दर्शन झाल्यानंतर नेपाळमध्ये जात असताना काठमांडू जिल्ह्यात पोखरा पॉइंटवरून बस जात होती. एक बस सुरळीतरित्या पुढे निघाली, मात्र दुसरी बस चालकाचे नियत्रंण सुटून नदीत कोसळली. यामुळे बसमधील 27 जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत गेलेल्या अंकित जावळे यांच्या मातोश्री नीलिमा जावळे यांचाही समावेश होता. 

नेपाळ बस अपघातात आईचा मृत्यू 

अंकित जावळे हा लहान असतानाच आजारपणामुळे त्याचे पितृछत्र हरपले होते. आजी आजोबा आणि आई नीलिमा जावळे यांच्यासोबत राहत असताना कोरोना काळात त्याने आपल्या आजी आजोबांना ही गमावले. या धक्क्यातून सावरत नाही तो त्याचा एकमेव आधार असलेल्या आईचाही आता नेपाळ बस अपघातात मृत्यू झाला आहे. अंकित जावळे हा घरात एकटाच पडला आहे. आता एकट्याने जगायचे  कसे? असा प्रश्न त्याच्या पुढे पडला आहे. 

देवाने दुःख पचविण्याची शक्ती द्यावी

अंकित जावळे हा तरुण त्याच्या आईसोबत शेतीकाम करून आपला उदरनिर्वाह करत असे. आईची मदत असल्यानं शेती करणे शक्य होत होते. आता मात्र घरातील आधार तर गेलाच शिवाय उदरनिर्वाहाचाही आधार गेल्याने अंकित पुढे मोठे संकट आले आहे. नेपाळ बस अपघातात अंकितने आपली आई गमावली. तसे आपल्या जवळचे सहा नातेवाईक देखील गमावले असल्याने अंकित जावळे हा या अपघाताने सुन्न झाला आहे. देवानेही दुःख पचविण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आता तो करत आहे. 

आणखी वाचा

मोठी बातमी! नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक मदतीची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Embed widget