Chandrakant Patil : 'जयंत पाटलांना बदाम पाठवा, त्यांना खुराकाची गरज'; आमदार चंद्रकांत पाटलांचा रोहिणी खडसेंना टोला
Chandrakant Patil : मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवणार आहोत, असे वक्तव्य रोहिणी खडसे यांनी केले होते.
जळगाव : मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना बदाम पाठवणार आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Camp) नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केले होते. यावरून आता मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Camp) आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी रोहिणी खडसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. खऱ्या अर्थाने त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना बदाम खाण्याची आवश्यकता असल्याची टीका त्यांनी केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाबाबत अधिवेशनामध्ये (Maharashtra Monsoon Session) महत्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे. यासाठी रोहिणी खडसेंनी चष्मा लावायला हवा. चष्म्याचा आकडा बदलावा मग दिसेल. लोकांना बदाम पाठवण्यापेक्षा आपल्याच पक्षातल्या लोकांना आपल्या शेतातील बदाम आणि खजूर पाठवा. त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना बदाम खाण्याची आवश्यकता असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे उद्योगधंदे
ते पुढे म्हणाले की, जयंत पाटील (Jayant Patil) यांनाच बदाम पाठवा. त्यांना खुराकाची गरज आहे. खजूर तर तुमच्या शेतात आहेत. ते तुमच्या पक्षातल्या लोकांना पाठवा. सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सध्या सरकत चालली आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे उद्योगधंदे सुरू आहेत. आपल्या घरात सरकार आहे. केंद्रीय मंत्रीपद देखील घरात आहे. बसून सरकारच्या हिताचे निर्णय घ्या, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटलांची रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर
रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, रोहिणी खडसे कदाचित मुक्ताईनगरचे (Muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलत असाव्यात. त्यांचे आणि माझे नाव सारखेच असल्याने त्यांचा नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे रोहिणी खडसेंना कदाचित त्या चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवायचे असतील. मला बदामाची आवश्यकता नाही, कारण मी कोल्हापूरचा (Kolhapur) आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
विधीमंडळातील भेटीची A टू Z कहाणी! आधी चंद्रकांत पाटील, मग देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची भेट