Manoj Jarange: जरांगेंच्या सभेत शिरून खिसे कापणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला
मनोज जरांगेंच्या सभेतील चोरट्याला मलकापूर MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चोरट्यानं आतापर्यंत अडीच ते तीन लाख रुपये चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव : मराठा आरक्षणासाठी (Maratha Resrvation) जरांगे पाटलांचा (Manoj Jarange) राज्यभर दौरा सुरु आहे. जरांगेंच्या सभेला मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक सभेला लाखो मराठा बांधवांनी उपस्थिती असेते. जरांगेच्या सभेसाठी किती मोठे मैदान घेतले तरी कमी पडते. मात्र जरांगेच्या (Manoj Jarange) या सभेत चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. जरांगेचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या सहभागी लोकांचे अनेक साहित्य चोरी गेले आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरीसाठी चोरटे सक्रिय असल्याचं समोर आलं. मनोज जरांगेंच्या सभेतील चोरट्याला मलकापूर MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चोरट्यानं आतापर्यंत अडीच ते तीन लाख रुपये चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे यांच्या ताफ्यात शिरून विविध ठिकाणी लोकांच्या खिशातून रक्कम उडवणाऱ्या भामट्याला मलकापूर MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनोज जरांगे यांच्या ताफ्यात एका अज्ञात व्यक्तीने स्वागतासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याच्या खिशात हात घातला त्यावेळी ही घटना समोर आली. कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी या भामट्याला कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि ताब्यात घेतलं. या भामट्याने काल एकाच दिवसात जवळपास अडीच ते तीन लाख रुपये या ताफ्यातून विविध ठिकाणी उडविल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. सोमवारी मनोज जरांगे यांची जामनेर भुसावळ मुक्ताईनगर येथे छोटेखानी सभा पार पडली होती .
लाखो रूपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला
मनोज जरांगेच्या सभेसाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सोने आणि रोख रकमेसह लाखो रूपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारल्याच्या घटना समोर येत आहे. या प्रकरणी सभेनंतर संबंधित पोलिस स्थानकात अनेत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
जरांगेंच्या आणखी एका सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राचा दौरा करत असून, ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तर, आपल्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील मनोज जरांगे यांच्या अशाच एका कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड शहरातील भारुका नगर येथील गिरणी ग्राऊंड झालेली सभा वेळेत झाली नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :