Jalgaon Viral Video : जळगावमध्ये तरुणीचा तरुणावर भररस्त्यात चाकू हल्ला, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Jalgaon Viral Video : जळगावमध्ये तरुण तरुणीचा भररस्त्यात झालेला भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jalgaon Viral Video : तरुण तरुणीचा भांडणाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला असून या व्हिडिओत तरुणीने तरुणावर चाकू हल्ला जखमी (knife Attack) केल्याचे दिसते आहे. हा व्हिडीओ जळगाव शहरातही असून अद्याप या व्हिडीओ संदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे तरुण तरुणी नेमके कोण आणि कशावरून वाद सुरु आहे, याबाबत माहिती नाही.
आजकाल दिवसाढवळ्या कोणीही चाकूने वार, मारहाण करत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. अशातच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात भर रस्त्यात तरुणी तरुणावर शिव्यांची लाखोली वाहत चाकूचे वार करत असल्याचे आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ जळगाव (jalgaon) शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील महा मार्गावरील असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र या घटनेत पोलिसात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नसल्याचे समजते आहे. ही घटना नक्की काय आहे? व्हिडिओत दिसणारे हे तरुण आणि तरुणी कोण आहेत? याचा उलगडा होऊ शकला नाही. या प्रकरणाचा शोध स्थानिक पोलिस प्रशासन घेत आहे.
जळगाव शहरातील अजिंठा चौकात रविवारी भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करून एका तरुणावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला छातीजवळ चाकू लागून तो जखमी झाला. मात्र तरुणाला गंभीर जखमी करण्याचा तिचा प्रयत्न फसला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी चांगलाच व्हायरल झाला. मात्र पोलिस ठाण्यात अद्यापही या घटनेबाबत कुठलीच नोंद नव्हती. शनिवार 6 मे रोजी सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान हॉटेल महेंद्राजवळ एक हिसकवण्याचा प्रयत्न करीत होता. तरुण व एक तरुणीचा गोंधळ सुरू होता. काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढून तरुणाच्या छातीवर वार केला. चाकू लागल्याने तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली. तरीही तरुणी चाकू मारण्याचा प्रयत्न करत होती. तो हिसकवण्याचा प्रयत्न करीत होता. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता.
व्हायरल व्हिडिओत काय दिसतंय?
एक तरुणी हातात चाकू घेऊन आपल्या सोबतच्या तरुणाला रागाने बोलत आहे. तर याच सुमारास या तरुणीने तरुणाच्या छातीवर चाकूने वार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंगातील शर्ट पूर्ण लाल झाले आहे. काही मिनिटात हा तरुण देखील अंगातील शर्ट काढून टाकत आहे. तरुणीसोबत कोणत्याततरी कारणावरून वाद घालत आहे. दुसरीकडे तरुणी आपल्या हातातील चाकूच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा वार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या मात्र व्हिडिओत नास दिसणारी एक महिला तरुणीला चाकू जमिनीवर टाकून देण्याची विंनती करत असल्याचे व्हिडिओतून ऐकू येत आहे. सद्यस्थितीत हा व्हिडीओ व्हायरल झाला असून याबाबत पोलिसांनी अद्याप कारवाई केली नसल्याचे समजते.