Jalgaon Political News : ...घराणेशाही ही खडसेंकडेच! घराणेशाही वरून गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल
Jalgaon Political News : खडसेंनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करत, तसेच धमक्या देऊन सर्व पद घरात घेतल्याची टीका गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली आहे.
Jalgaon Political News : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुलगा नाही, हे दुर्दैव असल्याचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणतात, मात्र घराणेशाही ही एकनाथ खडसे यांच्याकडेच असून दुधामधील अ ब क ड माहिती नसताना दूध संघातील अध्यक्षपद असो किंवा महानंदावर सेट अप असो, खडसेंनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करत धमक्या देऊन सर्व पद घरात घेतल्याची टीका करत गिरीश महाजन यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
''खडसेंनी काहीही सोडलं नाही''
गिरीश महाजन म्हणाले, खडसे सहा वेळा आमदार झाले त्यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य होता, सून खासदार मुलगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष पत्नी दूध संघाचे अध्यक्ष असं खडसेंनी काहीही सोडलं नाही, मात्र तरी देखील ते आरोप करत असून मला मुलगा नाही हे माझं दुर्दैव, पण तुमचं सदैव तुम्हाला मुलगा होता तुम्ही काय केलं? असा सवाल गिरीश महाजन यांनी खडसेंसाठी उपस्थित केला आहे. दरम्यान माझ्या मुलींनाही राजकारणात मला आणता आलं असतं, मात्र माझा राजकीय वारसदार कुणीही नसून माझ्या नंतर पुढचे कार्यकर्ते उभे राहणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
"खडसेंकडून मंत्री पदाचा गैरवापर"
दूध संघाच्या मागील निवडणुकीत एकता खडसे यांनी एक वर्ष अध्यक्ष पद घेणार असल्याचे म्हटले मात्र त्यावेळी एकनाथ खडसेंकडे अध्यक्षपद असल्याने मंत्री पदाचा गैरवापर करत सात वर्ष त्यांनी ते पद आपल्या ठेवल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली आहे. घराणेशाही ही एकनाथ खडसे यांच्याकडेच असून दुधामधील अ ब क ड माहिती नसतानाही खडसेंनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला आहे.
गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना इशारा
सात वर्षात दूध संघाचं काय झालं? हे सर्वांना माहिती असून याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत व दूध संघाचे अधिकारी हे जेलमध्ये गेले आहेत. मात्र जेलमध्ये गेलेले अधिकारीच दुधात तुपात कोणी अपहार केला? हे पोलिसांच्या कबुली जबाबात अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यातून कोणीही वाचणार नसल्याचा इशारा गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंना दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकाचं काय? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी