एक्स्प्लोर

VIDEO : पहलगामची जबाबदारी पंडित नेहरु घेणार का? सुरक्षेत चूक, अमित शाहांनी राजीनामा द्यावा; दोनच मिनिटांच्या भाषणात संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut On Pahalgam Terrorist Attack : सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली होती. ते जर पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नवी दिल्ली : राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जबरदस्त वार केला. पहलगाम हल्ला हा सुरक्षेच्या चुकीमुळे झाला, त्याची जबाबदारी काय पंडित नेहरु घेणार का? या प्रकरणी अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच सरदार पटेल जर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर त्यांनी आरएसएसवर बंदी घातली असती आणि आज भाजपवाले दिसलेच नसते असा टोला त्यांनी लगावला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांना दोन मिनिटांच्या भाषणाची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "पहलगामच्या वेळी सुरक्षेत चूक झाली हे जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनीही मान्य केलं आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. त्याची जबाबदारी कोण घेणार? त्या हल्ल्याची जबाबदारी पंडित नेहरू घेणार का? पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जण मृत्यूमुखी पडले. त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी राजीनामा द्यावा."

सगळ्या चुका नेहरूच्या नावावर टाकता

संजय राऊत म्हणाले की, हे सरकार भूतकाळात रमणारे आहे, त्यामुळे प्रत्येक चूक ही नेहरुंच्या माथी मारली जाते. पंडित नेहरू त्यांना झोपू देत नाहीत आणि त्यांना जगूही देत नाहीत.

सरदार पटेल असते तर भाजपवाले दिसले नसते

पंडित नेहरुंमुळेच आज भाजपवाले समोर सत्तेत बसले आहेत. भाजपवाल्यांनी नेहरुंचे आभआर मानले पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, "पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले, सरदार पटेल हे पहिले पंतप्रधान बनले नाहीत ही चूकच झाली. सरदार पटेल यांनी पहिल्यांदा आरएसएसवर बंदी घातली होती. जर सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते. त्यांच्यावर बंदी घातली असते."

त्या आधी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांचं संसदेतील भाषण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झाल्यास 'रुदाली' होती. मोदींनी एकदाही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही. ट्रम्प यांचे नाव घ्यायला मोदी घाबरतात असं राऊत म्हणाले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget