एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघासाठी आज मतदान, खडसे-महाजनांची प्रतिष्ठा पणाला  

आज जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान (Jalgaon zilla Dudh Sangh Election) होणार आहे. एकूण 20 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

Jalgaon zilla Dudh Sangh Election : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान (Jalgaon zilla Dudh Sangh Election) होणार आहे. एकूण 20 जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठी ही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

विजय आमचाच, गिरीश महाजनांना विश्वास  

जिल्हा दूध संघाची निवडणूक आमच्यासाठी कबड्डीच आहे. मी क्रीडामंत्री असल्यानं तर दुसरीकडे गुलाबराव पाटील माझ्यासोबत असल्यानं या स्पर्धेत विजय आमचाच होईल असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे. गिरीश महाजन हे उत्तम कबड्डी खेळत असले तरी मी अंपायर आहे  असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं होते. खडसेंच्या या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार घेतला. अंपायर वगैरे काही नाही. त्यांनी आमच्या समोर या निवडणुकीची कबड्डी खेळा आणि जिंकून दाखवा असं आव्हान एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांनी दिले.

या निवडणुकीत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल

जिल्हा दूध संघात निवडणुकीत सत्तेचा वापर करत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल, धनाचा वापर होईल असे एकनाथ खडसे म्हणाले. विरोधकांवर आता आम्हाला बोलयचं नाही किंवा त्यांना उत्तर पण द्यायच नाही. मात्र मतदार सत्याच्या बाजूने आहेत. ते मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी दिसेलच अस म्हणत खडसेंनी विरोधकांना प्रति आव्हान दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Jalgaon News : एकनाथ खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, खडसे आपलेच, त्यांना सहकार्य करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 06 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Election Result : हरियाणात भाजपची  हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोषSupriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHAJammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
Embed widget