एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत जिल्ह्यात लखपती दीदीचा कार्यक्रम, नेपाळ अपघातातील मृतांवर रात्रीच अंत्यसंस्कार, एकनाथ खडसेंची माहिती

Narendra Modi, Jalgaon : नेपालमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे 26 मृतदेह आज (दि.24) विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या जळगाव जिल्ह्यात लखपती दीदीचा कार्यक्रम आहे.

Narendra Modi, Jalgaon : नेपालमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे 26 मृतदेह आज (दि.24) विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या जळगाव जिल्ह्यात लखपती दीदीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे नेपाळ अपघातातील मृतांवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. 

एकनाथ खडसे काय काय म्हणाले?

नेपाळ येथील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मयत व्यक्तींचा आकडा वाढला आहे.  नेपाळ येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगावच्या वरणगाव येथील आणखी तीन जणांचा  मृत्यू झालाय. मृतांचा आकडा 30 वर पोहचला आहे. ही  घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. अपघातामध्ये माझ्या बालपणीच्या मित्राचा मृत्यू झालाय, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 

मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केलं

नेपाळ येथून जळगाव विमानतळावर मृतदेह आणण्यात आले. त्यानंतर  रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मृतदेह वरणगाव येथे पोहोचले आहेत. वरणगाव येथील मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केलं. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्यामुळे आजच रात्री मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 

आता निमंत्रण मिळालं तर जाणार नाही, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली नाराजी 

नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधन कारक असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं. वेळेत निमंत्रण मिळाला असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो.  मात्र आता निमंत्रण मिळालं तर जाणार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Eknath Khadse : नेपाळमधील बस अपघातात माझा बालमित्र हरपला, मित्राच्या आठवणीनं नाथाभाऊ गहिवरले; वरणगावकडे 26 अँब्युलन्स रवाना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh And Vaibhavi Deshmukh | सरकारचे डोळे कधी उघडणार? वैभवीचा संतप्त सवाल, तर सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार, धनंजय देशमुखांची माहितीRaj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोलTop 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 08 March 2025 | 5 PmABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 09 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Embed widget