Eknath Khadse : नेपाळमधील बस अपघातात माझा बालमित्र हरपला, मित्राच्या आठवणीनं नाथाभाऊ गहिवरले; वरणगावकडे 26 अँब्युलन्स रवाना
Eknath Khadse on Nepal Bus Accident : नेपाळ येथील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मयत व्यक्तीचा आकडा वाढलाय. नेपाळ येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगावच्या वरणगाव येथील आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
Eknath Khadse on Nepal Bus Accident : नेपाळ येथील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मयत व्यक्तीचा आकडा वाढलाय. नेपाळ येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगावच्या वरणगाव येथील आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नेपाळमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 30 वर पोहचला असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते.
नेपाळ येथील अपघातामध्ये एकनाथ खडसे यांच्या बालपणीचा मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती
घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. नेपाळ येथील अपघातामध्ये एकनाथ खडसे यांच्या बालपणीचा मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती देताना एकनाथ खडसे भावूक झालेले पाहायला मिळाले. नेपाळ येथून जळगाव विमानतळावर मृतदेह आणण्यात येवून तेथून रुग्णवाहिकेची माध्यमातून मृतदेह वरणगाव येथे पोहोचले आहेत. वरणगाव येथील मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केलं. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्यामुळे आजच रात्री मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिलीये.
कुठलंही निमंत्रण आमदार म्हणून मला दिलेलं नाही
नरेंद्र मोदी यांचा हा शासकीय कार्यक्रम नाही. त्याच कुठलंही निमंत्रण आमदार म्हणून मला दिलेलं नाही. त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणार नाही. शासकीय निमंत्रण नसल्यामुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
जर निमंत्रण मिळालं तर जाणार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले
सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधनकारक असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं. वेळेत निमंत्रण मिळाला असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र आता आहे त्यावेळी जर निमंत्रण मिळालं तर जाणार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
नेपाळ बस अपघातामधील सत्तावीस पैकी जळगावातील पंचवीस मृतांचे मृतदेह भारतीय वायू सेनेच्या विमानाने आणण्यात आले आहेत. नेपालमधील काठमांडू येथील विमान तळावरून जळगाव विमानतळावर आणण्यात आले आहेत, तर उर्वरित दोन मृतदेह हे उत्तर प्रदेशातील असल्याने ते त्या ठिकाणी उतरवण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मृतदेहांसाठी 26 स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. नातेवाकांसोबत हे मृतदेह त्यांच्या घराचा पर्यंत नेले जाणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या