एक्स्प्लोर

जामनेरमध्ये उसळणार कुस्तीप्रेमींचा जनसागर, विजय चौधरी ते सिकंदर शेख दिग्गज मल्ल ठोकणार शड्डू

Jamner : जामनेर तालुक्यात रविवारी ११ फेब्रूवारीला भारतातील रथी-महारथींमधील कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. जामनेरमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. जागतिक कीर्तीच्या खासबाग अखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या स्टेडियममुळे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन असा सामना पाहायला मिळणार आहे.

Jamner : जामनेर तालुक्यात रविवारी ११ फेब्रूवारीला भारतातील रथी-महारथींमधील कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. जामनेरमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. जागतिक कीर्तीच्या खासबाग (Khasbaug Maidan) अखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या स्टेडियममुळे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (Sikandar Shaikh) विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक १६ कुस्त्या आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील १०० पेक्षा अधिक पैलवानांच्या द्वंद्वाचा आगळावेगळा अनुभव जामनेरकरांना लाभणार आहे.

नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयामुळे ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे भारतातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचे अर्थातच 'नमो कुस्ती महाकुंभ'चे दिमाखदार आयोजन केले जाणार आहे. कुस्तीवर असलेले प्रेम आणि कुस्तीचा अखाडा गाजवण्यासाठी लालमातीत उतरणार्‍या दिग्गज पैलवानांमुळे या कुस्तीच्या कुंभाला पाहण्यासाठी उसळणार्‍या जनसागरासाठी तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक क्षमतेची आसनव्यवस्था गोविंद महाराज क्रीडांगणावर उभारण्यात आली आहे. जे आजवर कुणालाही जमले नाही, असे भव्य आणि दिव्य आयोजन जामनेरमध्ये केले जाणार आहे. ही एकदिवसीय कुस्ती दंगल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लढतींमुळे कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहिल, असे दिमाखदार आयोजन रविवारी केले जाणार आहे. कुस्ती जगतातील रथी-महारथी एकाच वेळी एका मंचावर आणण्याचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचला जाणार आहे. 

या एकदिवसीय दंगलीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला आव्हान देण्यासाठी भारत केसरी बिनिया मिनने दंड थोपटले आहेत. तसेच महेंद्र गायकवाड (उप महाराष्ट्र केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी), विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. मुस्तफा खान (जम्मू केसरी), प्रकाश बनकर (उप महाराषट्र केसरी) वि. भूपिंदर सिंह (भारत केसरी), किरण भगत (उप महाराष्ट्र केसरी) वि. गुरुजनट सिंह (पंजाब केसरी),  बालारफिक केसरी (महाराष्ट्र केसरी) वि. मनप्रीत सिंग (पंजाब केसरी), अजय गुज्जर (भारत केसरी) वि. माउली कोकाटे (उप महाराषट्र केसरी), सुमित मलिक (अर्जुन अवॉर्ड, हिंदकेसरी) वि. हॅपी सिंह (पंजाब केसरी), प्रितपाल सिंग वि. शंटी कुमार(दिल्ली केसरी),  समीर शेख (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. कलवा गुज्जर (भारत कुमार), जतींदर सिंह (रुस्तम ए पंजाब) वि. सत्येन्द्र मलिक (भारत केसरी), कमलजित (रुस्तम ए हिंद) वि. माउली जमदाडे (भारत केसरी), बाबर पैलवान (भारत केसरी) वि. मोनू खुराणा, विलास डोईफोडे (उप महाराष्ट्र केसरी) वि.  प्रवीण भोला आणि रेहान खान (मध्य प्रदेश केसरी) वि. कमल कुमार (शेर ए पंजाब) या दिग्गजांच्या कुस्त्या क्रीडाप्रेमींना याची देही याची डोळा पाहाता येणार आहे. या दिग्गजांबरोबर खान्देश आणि परिसरातील १०० पैलवान सुद्धा या दंगलमध्ये आपल्या कुस्तीचे डावपेच दाखविणार आहेत. या मैदानात निवेदक म्हणून पै. सुरेश जाधव (चिंचोली),  शरद भालेराव (जालना),  युवराज केचे हे उपस्थित कुस्तीप्रेमींना आपल्या मधाळ वाणीतून मंत्रमुग्घ करण्यासाठी सज्ज झाली आहेत. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध हलगीवादक सुनील नागरपोळे हलगीवादन करून कुस्तीप्रेमी आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहित करण्याचे कर्तव्य बजावणार आहेत.

विजेते होणार लखपती

जामनेरमध्ये रंगणारी दंगल संस्मरणीय व्हावी म्हणून ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांनी १३ दंगलीतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करणार असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर विजेत्या खेळाडूला ३ किलो वजनाची चांदीची गदा आणि नमो कुस्ती महाकुंभ हा मानाचा पट्टाही बहाल केला जाणार असल्याचे सांगितले. अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी जामनेरमध्ये  आपल्या मातीतील खेळाचे आयोजन करून तरुण पिढीला 'नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा' हा  संदेश आम्ही देणार आहोत. त्यामुळे जामनेरकरांनीr न भूतो न भविष्यति ठरणार्‍या कुस्तीच्या महाकुंभाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray : 'सबका साथ मित्र का विकास', मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget