एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jalgaon News : सासू विरुद्ध सून, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्याविरोधातील प्रचारात रक्षा खडसे सहभागी

Jalgaon News : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे

Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे (Manda Khadse) आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यात होत आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे

रक्षा खडसे यांची गोची
जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमुळे भाजप खासदार रक्षा खडसे यांची चांगलीच गोची झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे नेते हे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात मुक्ताईनगर इथे प्रचार मेळाव्यात खडसे परिवाराच्या घराणेशाहीसह दूध संघातील अपहार प्रकरणात जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याच परिवाराच्या विरोधात ही टीका ऐकत असताना खासदार रक्षा खडसे यांची मात्र चांगलीच गोची होताना दिसून येत आहे. मात्र महाभारतात ज्याप्रमाणे कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाला आपल्याच लोकांच्या विरोधात लढावे लागले होते, त्याच पद्धतीने  राजकारणात आता खासदार रक्षा खडसे यांनाही आपल्या पक्षाशी आणि नेत्यांशी बांधिलकी दाखवत आपल्याच सासूच्याविरोधात प्रचारात उतरावे लागले आहे. 

सासू-सुनेमधील लढाई चर्चेचा विषय
भाजपा आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलला विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवारी (4 डिसेंबर) मुक्ताईनगर इथे पार पडलेल्या दूध संघ निवडणूक प्रचार मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं व्यवस्थापन करु पाहणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायला पाहिजे, त्यांना विजयी केले पाहिजे असं सांगत आपल्या शेतकरी विकास पॅनलला विजय करण्याचं आवाहन रक्षा खडसे यांनी केले आहे. त्यांचे हे आवाहन म्हणजे त्यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात आहे. ही लढाई लढण्यासाठी खासदार रक्षा खडसे या मैदानात उतरल्या असल्या तरी त्यात त्यांना यश मिळते की सासू मंदाताई खडसे यांना यश मिळते हे लवकरच कळणार आहे. परंतु सध्या तरी राजकीय क्षेत्रात या सासू आणि सुनेमधील लढाई मात्र चर्चेचा विषय बनली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget