(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : बंड करुन नऊ महिने झाले, तेच तेच बोलून आम्हाला छळण्यापेक्षा नव्याने पक्ष बांधणी करा : गुलाबराव पाटील
Jalgaon News : "आमच्या बंडाला आता नऊ महिने होऊन गेले. किती दिवस एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा," असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
Jalgaon News : "आमच्या बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेले. किती दिवस एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा," असा सल्ला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबतच्या गौप्यस्फोटावर दाव्यावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
आता राज्याचे काही बघणार आहे की नाही? : गुलाबराव पाटील
एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद इथे गौप्यस्फोट केला. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असं एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन रडून सांगितलं होतं. असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, "आमच्या बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेले आहे. किती दिवस एकाच विषय लावून आम्हाला छळणार आहात? तेच तेच बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही. आता राज्याचे काही बघणार की नाही? एखाद्या घरात तरुणाचा मृत्यू झाला तरी काही दिवसात लोक ते विसरण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही आम्हाला आता विसरा. खरंतर आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार केला पाहिजे, यासाठी प्रयत्न आता केला पाहिजे. तेच तेच पाहून लोकही कंटाळले असून टीव्ही पाहत नाहीत."
....तर परमेश्वर त्यांचं भलं करो!
दरम्यान उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथे 23 एप्रिल रोजी सभा होत आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेरण्यासाठी ही सभा घेतली जात असल्याची चर्चा आहे. या विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, माजी आमदार स्व. आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावर कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे येत आहेत अशी माहिती आहे. शिवाय पक्षप्रमुख म्हणून ते येतील. पुतळा अनावरण करण्यात राजकारण होऊ नये ही अपेक्षा आहे. मात्र त्यातही जर राजकारण येत असेल तर परमेश्वर त्यांचं भलं करो.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे यांनी एक दिवसाचा हैदराबाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गीतम विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, "शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की भाजपसोबत हातमिळवणी करा अन्यथा ते आम्हाा जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असं ते सांगत होते."
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे मातोश्रीवर रडले होते : आदित्य ठाकरे