एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? खडसेंवर टीका करताना गिरीश महाजनांचं वक्तव्य
Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? खडसेंवर टीका करताना गिरीश महाजनांचं वक्तव्य
Girish Mahajan on Eknath Khadse : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वैर हे सर्वश्रूत आहेच. अशातच गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना डिवचलं आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की, आत्महत्या? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला आहे. महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी देखील उत्तर दिलं आहे. महाजन यांच्या आरोपांमुळे कुटुंबाच्या भावना दुखावल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे. शिवाय खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही खडसेंनी महाजनांवर केला आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यामधल्या शाब्दिक युद्धानं आता विखारी वळण घेतलं आहे. एकनाथ खडसेंच्या मुलानं आत्महत्या केली होती की, त्यांचा खून झाला, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोलताना गिरीश महाजनांना मुलगा नसल्याचा उल्लेख खडसेंनी जाहीररित्या केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाजनांनी आता खडसेंच्या मुलाच्या मृत्यूविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.
एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे (Nikhil Khadse) यांनी आपल्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात नेमकं काय झालं याचा अजूनही तपास पूर्ण झालेला नाही. त्याच मुद्यावर बोट ठेवून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. खडसेंच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? त्यांनी आत्महत्या केली की, त्यांचा खून झाला? असे प्रश्न महाजन यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात एबीपी माझाशी दूरध्वनीवरून संवाद साधला. महाजनांच्या पक्षाचं सरकार राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर आहे. त्यांनी माझ्या मुलाचा मृत्यू कसा झाला, याची अवश्य चौकशी करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, महाजन यांच्या आरोपांमुळे कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या असून खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही खडसेंनी महाजनांवर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचा सवाल; खडसे म्हणाले...