(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon : मुक्ताईनगरमध्ये नगरसेविकेच्या मुलाला माय-लेकीनं भररस्त्यात चोपलं, फोटो चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल केल्याचा आरोप
Muktainagar Latest News : महिलेसह तिच्या मुलीचे फोटो चुकीचे संदर्भ देवून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने मायलेकीचा संताप, भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण
Jalgaon Muktainagar Latest News : एका तरुणीसह तिच्या कुटुंबियांचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देवून व्हायरल (Viral) केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर (Muktainagar ) येथे घडला होता. यावरुन तरुणीसह तिच्या आईने फोटोवर चुकीचे मेसेज टाकून तो व्हायरल करणाऱ्या नगरसेविकेच्या मुलाला भररस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. संतापात तरुणीसह तिच्या आईने संबंधित तरुणाला कपडे फाटेपर्यंत मारले. अनिम खान असे या नगरसेविका मुलाचे नाव असून तो एकनाथ खडसे समर्थक असल्याची माहिती महिलेने पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. यावरुन मुक्ताईनगरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो, चुकीचे संदर्भ देऊन सोशल मीडियावर वायरल केल्याचा संतापातून महिलेने नगरसेविकाचा मुलगा अनिम खान यास चोप दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरमधे घडली आहे. नगरसेविका पूत्रावर तरुणीसह तिच्या आईने प्रचंड संताप व्यक्त केला. त्यानंतर या नगरसेविका पूत्राला भररस्त्यात गाठले. तरुण दिसताच त्याला मारहाण करण्यास करण्यात सुरुवात केली. अचानकच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. नागरिकांची मोठी गर्दी यावेळी जमली होती. तरुणीसह तिच्या आईने नगरसेविका पूत्राला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. हा नगरसेविका पूत्र खडसे समर्थक असल्याची माहिती महिलेने पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आज मुक्ताई नगर येथे नगराध्यक्ष पदाची निवड होती, मात्र आयत्या वेळी उच्च न्यायालयाच्या निर्देशांवरून ही निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास मुक्ताईनगर शहरात मारहाण झाल्याने विविध विविध चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान नगरसेविका पूत्राला मारहाण केल्याच्या घटनेची मुक्ताईनगर शहरात एकच चर्चा होती. या घटनेमुळे शहरातील वातावरण तापले आहे.