एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jalgaon News : अडीच वर्षांतील सरकारने मराठा आरक्षण घालवलं, आता पुतणा मावशीचं प्रेम, महाजनांनी घटनाक्रमच सांगितला! 

Girish Mahajan : मागच्या अडीच वर्षात त्यांनी लक्ष दिलं नसल्याने त्यांनी हे आरक्षण घालवलं. हा लोकसभेत, विधानसभेत सुटणारा विषय राहिलेला नाही असे महाजन यांनी म्हटले.

जळगाव : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. ते तुमच्या माझ्या चर्चेमध्ये काही सुटणार नाहीत. सर्वांना माहित आहे, हा न्यायप्रविष्ठ विषय होता. हायकोर्टापर्यंत आपण आरक्षण टिकवले, आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र यांनी न्यायालयात चांगले वकील न दिल्याने तो प्रश्न सुटू शकला नाही. मात्र मागच्या अडीच वर्षात त्यांनी लक्ष दिलं नसल्याने त्यांनी हे आरक्षण घालवलं. हा लोकसभेत, विधानसभेत सुटणारा विषय राहिलेला नाही, त्यात सर्व बाजू समजून घेऊन तज्ञ मंडळींशी चर्चा करून यावर तोडगा काढू असे आवाहन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. 

मंत्री गिरीश महाजन आज जळगावमध्ये (Jalgaon) असताना त्यांनी जालना येथील घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, जालना (Jalna) येथील झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मागील चार-पाच दिवसापासून त्यांचे हे आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. अशाप्रकारे रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये, हे योग्य नसल्याने सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. मात्र दुर्दैवाने होऊ शकलं नाही, म्हणून तब्येत आणखी खालावू नये यासाठी पोलीस त्यांना घ्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली, जनतेचा रोष एवढा झाला होता की त्यांना आवरणं कठीण झालं होतं, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. मात्र परंतु तो इतका बेछुटपणे केला की त्याचा समर्थन कोणी करू शकत नाही. या संपूर्ण घटनेचे चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे महाजन म्हणाले. 

या घटनेत उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे राजकीय ढोंग करत आहेत, याबाबत त्यांचं प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे, त्यांच्या काळात त्यांनी काय केले ते पाहिले पाहिजे.  त्यांनी राजकारण करू नये, आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र यांनी न्यायालयात चांगले वकील न दिल्याने तो प्रश्न सुटू शकला नाही. आणि आता ते या विषयावर राजकारण करत असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलकांना बेछूट मारहाण करणे हे निषेधार्थ आहे. मात्र कुठेही एसटी बसची जाळपोळ, सरकारी मालमत्तेची तोडफोड करू नये. उद्या आमच्या मुलांना शाळेत जायचं आहे, महिलांना प्रवास करायचा आहे. शेवटी ती आपली संपत्ती आहे, म्हणून कोणीही शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, सुद्धा आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र 

उद्धव ठाकरे यांच्या काळात अनेक अशा घटना घडल्या, मात्र त्यांनी त्यांची साधी विचारपूस देखील केली नाही, राजीनामा दिला नाही. आणि आता विरोधक त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत असल्याचं आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे विरोधकांनी मगरमच्छचे अश्रू गाळू नये, कारण शेवटी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आमच्या सरकारने केले आहे, मात्र त्यांनी ते टिकवले नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले की, अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं नाही, लोक मरत होते, त्यावेळी तुम्ही बघ्याची भूमिका घेतली. कोराना काळात सहाशे रुपयाची बॅग सहा हजार रुपयाला खरेदी करण्याचं काम कोणी केलं? असा सवाल करत उद्धवजींनी एवढा कळववा दाखवू नये, अशा घटनांमध्ये ते स्वतःला केविलवाणा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला मंत्री गिरीष महाजन यांनी लगावला आहे.

इतर महत्वाची बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Embed widget