एक्स्प्लोर

Jalgaon News : EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ

Jalgaon Lok Sabha Election : ज्यावेळी वीज गेली त्यावेळचे व्हिडीओ शुटिंग करण्यात आलं असून ते सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

जळगाव : वीज पुरवठा खंडित झाल्याने जळगावच्या (Jalgaon) ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे (EVM Strong Room CCTV) डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडल्याची घटना घडली. मात्र तातडीने जनरेटर सुरू करून पुन्हा ते पूर्ववत सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेला  दुजोरा दिला असून यात तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 

जळगावमध्ये रविवारी सकाळी 9 वाजेपासून ते 9.04 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी  फोनवरून ही माहिती कळवली होती. त्यानंतर लगेच हा वीज पुरवठा दुरुस्त करण्यात आला.

व्हिडीओ शुटिंग करून ठेवलं

बंद पडलेल्या चार मिनिटांच्या काळाचे व्हिडीओ चित्रण केले गेले असून या संदर्भात सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना ते दाखविण्यात आले असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या बाबत कोणाचीही तक्रार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटर वरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचे डिस्प्ले बंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  प्रसाद यांनी दिली. डिस्प्ले बंद झाले असले तरी या ठिकाणच्या सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत, तसेच यावेळी व्हीडीओ शूटिंग करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

जळगावच्या उमेदवारांचे भवितव्य मतदारपेटीत बंद

जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार (Karan Pawar)  आणि महायुती उमेदवार स्मिता वाघ (smita wagh) यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये आता विजय कोणाचा होणार आणि हार कोणाची होणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र, दोन्ही गटांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने मागील निवडणुकीत तिकीट कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपामधील खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारून थेट उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपसह त्यांच्या नेत्यांना आव्हान देत, भाजपमधून बाहेर पडलेल्या करण पवार यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. एन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील यांचं बंड भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहनCity 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines  17 June 2024Mallikarjun Kharge On Wayanad Lok Sabha : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार- खर्गे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
Embed widget