एक्स्प्लोर

धक्कादायक! जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच, 50 पैकी 16 मृतदेह बेवारस

Jalgaon News: जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खचधक्कादायक बाब म्हणजे, 50 पैकी सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जात आहे.

Jalgaon News: जळगाव : गेल्या आठ दिवसापासून जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले 50 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यातील सोळा मृतदेह हे बेवारस असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. ज्या व्यक्तींचे मृतदेह आहे, विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यात उन्हाच्या तीव्रतेने हे मृत पावली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी तब्बल 50 व्यक्तींचा मृत्यू झाला. आठच दिवसांत पन्नास मृतदेह जळगावातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यातील सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांत आढळून आलेले हे सर्व मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात दाखल करण्यात आली आहे. यासर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यानं यासर्व व्यक्तींचा उन्हाच्या तीव्रतेनं मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मृतदेहांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

राज्याचा पार दिवसेंदिवस वाढताच, उष्णतेनं अनेकांनी गमावले प्राण 

राज्यात मोठ्याप्रमाणावर तापमानाचा पारा वाढलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अकोला आणि जळगावात वाढत्या तापमानामुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी लावण्यात आला आहे. मालेगावात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसपर्यंत वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर यवतमाळमध्येही विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 अंशांच्या पार गेला आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM  : 17 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषदNagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यूShivaji Maharaj Wagh Nakh News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Sandhan Valley Closed : सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
Maharashtra Police Recruitment 2024 : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
पोलीस भरतीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
West Bengal train accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना
मोठी बातमी : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना
Chandu Champion Kartik Aaryan : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन
'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन
Embed widget