एक्स्प्लोर

Jalgoan Crime : स्टेट बँकेच्या दरोड्यात 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटींचं सोनं लुटले, चोरट्यांनी CCTV कॅमेऱ्याचा DVR ही पळवला

Jalgaon Crime : जळगावात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काल भरदिवसा दरोडा पडला. हेल्मेटधारी दोन दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकावर हल्ला करुन बँकेतील 17 लाख रुपयांची रोख रकमेसह तीन कोटी रुपयांचे सोनंही लुटून नेलं.

Jalgaon Crime : जळगावात (Jalgaon) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत काल (1 जून) भरदिवसा दरोडा (Robbery) पडला. हेल्मेटधारी दोन दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकावर हल्ला करुन बँकेतील 17 लाख रुपयांची रोख रकमेसह तीन कोटी रुपयांचे सोनंही लुटून नेलं. इतकंच नाही तर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा (CCTV Camera) डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.

तीन कोटींचं सोनं आणि 17 लाखांची रोकड लुटले

कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काल सकाळी बँक उघडताच दरोडा पडला. सकाळी दहा वाजता बँक उघडताच हेल्मेटधारी दोन तरुण बँकेत शिरले. त्यांनी कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत आणि मॅनेजर राहुल महाजन यांच्यावर चाकूने वार करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर त्यांच्याकडून लॉकरची चावी मिळवली. गोल्ड लोनसाठी बँकेतील लॉकरमध्ये असलेले तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर पळवला

यावेळी दरोडेखोरांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बँकेवर दरोडा टाकला. आपली ओळख पटू नये यासाठी दरोडा टाकताना त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलं होतं. तसंच बँकेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यास आणखी कोणती अडचण होऊ नये यासाठी डीव्हीआर देखील पळवून नेला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.

अवघ्या काही मिनिटांचा थरार

हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता.  त्यांनी बँकेतील 17 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

दरोडेखोरांना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान

जळगाव शहरातील गेल्या अनेक दिवसातील हा सर्वात मोठ्या रकमेचा दरोडा असल्याचं कळतं. त्यामुळे याचं गांभीर्य ओळख या दरोड्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं बनवली असून ती विविध ठिकाणी रवाना केली आहे. मात्र आरोपींची ओळख पटेल असा कोणताही पुरावा प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याने या दरोडेखोरांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातमी

Jalgaon Crime : जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा, चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लांबवले, चोरटे पसार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Embed widget