एक्स्प्लोर

Gulabrao Patil : '...तर बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद-भावजय सामना रंगणार'; गुलाबराव पाटलांचे वक्तव्य चर्चेत

Raver Lok Sabha : जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.

Gulabrao Patil : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections 2024) भाजपकडून (BJP) काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

रक्षा खडसे यांना उमेदवारी घोषित होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून त्यांच्या समोर सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काल बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु एकनाथ खडसे यांनी तब्येत ठीक नसल्याचे म्हटले. डॉक्टरांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या भावजय रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना उमदेवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत झाली होती. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर नणंद-भावजय लढत

यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून ते जे उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत. रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांच्या नावाच्या चर्चा आहेत. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद-भावजय असा सामना पाहायला मिळू शकणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील बामाभोरी गावात विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. 

...तर जयंत पाटील नक्कीच मंत्री राहिले असते

जयंत पाटील हे महायुतीत आले असते तर ते नक्कीच मंत्री राहिले असते. आता त्यांच्या लक्षात आले असेल की, आपण चूक केली आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी जयंत पाटलांना लगावला. मनसे, शिवसेना आणि भाजप एकाच विचार धारेचे पक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत चर्चा झाली असेल तर ते लवकरच बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मोदी म्हणाले ते रोज दोन किलो शिव्या खातात,  मग तुमचे हे तीनपाट आम्हाला रसगुल्ले देतात का? उद्धव ठाकरे राणेंवर तुटून पडले

Mumbai Lok Sabha: महायुतीला लोकसभेसाठी मनसेची साथ? भाजप, शिवसेना 1 ते 2 जागा सोडण्यासाठी तयार, जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget