एक्स्प्लोर

Mumbai Lok Sabha: महायुतीला लोकसभेसाठी मनसेची साथ? भाजप, शिवसेना 1 ते 2 जागा सोडण्यासाठी तयार, जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार?

Mumbai Lok Sabha: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 1 ते 2 जागा मनसेला सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना तयार असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Lok Sabha Election : मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) अद्याप जागावाटपाचा तिढा सुटत नाही, तेवढ्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 1 ते 2 जागा मनसेला (MNS) सोडण्यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) तयार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, महायुतीसोबत लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय असेल. महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीकडून मनसेला महायुतीच्याच चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण मनसेनं हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती मिळत आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची लोकसभा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत बंडाळीमुळे चुरशीची ठरणार आहे. अशातच आतापर्यंत लोकसभा लढवायची की नाही, याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य न करणारी मनसे मात्र आता लोकसभेच्या फ्रेममध्ये आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असल्यानंच राज ठाकरेंनी मुंबईतले सगळे दौरे रद्द केल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, वाटाघाटी 'ऑल वेल' झाल्यास मनसे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे महायुतीत दाखल होण्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्ठमंडळानंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच, मनसेला आपल्यासोबत कसं घेता येईल, याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींमध्येही चर्चा सुरू होती. पण आधी दोन पक्षांसोबत युती असताना, त्यात मनसेलाही सहभागी करुन घेणं आणि त्यात जागावाटपाचा प्रश्न यांवर तोडगा काढण्याचं काम भाजपकडून सुरू होता. 

महायुतीचं जागावाटप अद्याप रखडलेलंच, त्यात मनसेची एन्ट्री

अद्याप महायुतीचा लोकसभेसाठीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटपाच्या अनेक बैठका निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून जास्त जागांची मागणी होत आहे, त्यासाठी शिंदे आणि अजित पवारांवर दबाबतंत्रही वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. अशातच जर मनसेची एन्ट्री झाली, तर तिघांपैकी कोणाना कोणाची तरी जागा मनसेच्या खात्यात जाईल. आता मनसे जर महायुतीत आली आणि लोकसभा लढवली, तर त्यांच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

पाहा व्हिडीओ : MNS On Lok Sabha 2024 : मनसेनं महायुतीच्या चिन्हावर लढण्याचा महायुतीकडून प्रस्ताव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Embed widget