(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Price Hike: सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, ऐन लग्न सराईत दर वाढल्याने जनतेचे बजेट बिघडण्याची शक्यता
जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला आहे. ऐन लग्न सराईत दर वाढल्याने माध्यम वर्गीय जनतेचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.
Gold Price Hike: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही (Gold Price) कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराईच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांचे बजेट कोलमडले आहे. सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने 62 हजारांवर उसळी घेतली आहे. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला आहे. ऐन लग्न सराईत दर वाढल्याने माध्यम वर्गीय जनतेचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर 62000 च्या वर जाऊन पोहचल्याने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. जागतिक पातळीवर अनेक बँका तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदारांनी बँकामधील पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर आज जळगाव चे सुवर्ण नगरी मध्ये जी एस टी सह 62000 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहे. लग्नसराई असताना ही अनेक जण बजेट बिघडले आहे.
ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोने महागले
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहे. ग्राहकांना आपल्या बजेटपेक्षा कमी सोने खरेदी करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे सोनं खरेदीचीही रेलचेल सुरू झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दागिन्यांची शुद्धता कुठे तपासाल?
दरम्यान भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं. पण सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.